सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार

By Admin | Updated: May 24, 2017 00:09 IST2017-05-24T00:09:29+5:302017-05-24T00:09:29+5:30

अंजनगावातील सावकारपुरा भागात १० दिवसांपूर्वी जप्त केलेल्या रकमेच्या तुलनेत सुर्जी भागातील लाल चौकात एका दुकानावर धाड टाकून जप्त केलेली रक्कम नगण्य होती.

The main facilitator who speculative | सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार

सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार

आयपीएल सट्टा प्रकरण : परिचित लोकांकडून स्वीकारायचे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : अंजनगावातील सावकारपुरा भागात १० दिवसांपूर्वी जप्त केलेल्या रकमेच्या तुलनेत सुर्जी भागातील लाल चौकात एका दुकानावर धाड टाकून जप्त केलेली रक्कम नगण्य होती. हा सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनीच डमी ग्राहक बनून सट्टा लावला.
या प्रकरणात प्रफुल्ल फुलारी व दीपक मंडलिक यांना अटक करण्यात आली होती. सट्टा घेणारा पान मटेरिअलचा व्यवसाय व गुटखा विक्री करणारा जवळच्या मित्राकडून सट्टा स्वीकारत होता. त्याआधारे पोलिसांनी पथक तयार करून ठाणेदारांनी हा प्रकार उघडकीस आणला. मात्र यात मोठे घबाड हाती लागले नाही. सट्टा घेणारा मद्यस्थाने याने पोलिसांना गुटखा विक्रे त्याच्या हालचालीची माहिती दिली.
पोलिसांना स्वत: डमी ग्राहक बनून साध्या वेशात मध्यस्थाच्या माध्यमातून सट्टा लावला. त्याच्यावर गोपनीय कॅमेऱ्याच्या माध्यामतून नजर ठेवण्यात आली. गुटका विक्रेत्याने सट्ट्याची रक्कम स्वीकारताच त्याला अटक केली. त्याने मोठा सट्टा स्वीकारला असावा, असा संशय आल्याने सट्टा चालविणाऱ्यास अटक करण्याची भीती दाखविली. मात्र, आरोपीने विरोध दर्शविला नाही.
शहरात घडलेल्या दोन सट्टा प्रकरणांची चर्चा चौकाचौकांत आहे. "लोकमत"ने हे प्रकरण लावून धरल्याने हा विषय वाचकांत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी पकडलेले आरोपी वगळता. याच्याशी संबंधित अन्य लोकांचे रहस्य मात्र कायम आहे.

छायाचित्रावरून उडाली शहरात खळबळ
अंजगनगाव क्रिके ट सट्ट्यातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकरचा फोटो "लोकमत"ने प्रसिद्ध करताच अंजनगाव सुर्जीमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा छडा अंजनगाव पोलिसांनी लावून संजय उदापूरकर यास अटक करून दाखविण्याचे धाडस करावे, अशी चर्चा अंजगावात चौकाचौकांत सुरू आहे. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळीपासूनच "लोकमत"च्या या वृत्ताची चांगलीच चर्चा होती. अमरावतीचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी यावर कारवाई सुरू केली. आम्ही मुख्य आरोपी अटक करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
"लोकमत"ला मिळालेल्या माहितीनुसार अमरावती पोलीस अधीक्षकांनी अंजनगावच्या ठाणेदाराशी बोलून या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ग्रामीण पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: The main facilitator who speculative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.