धामणगावच्या जंगलात आढळले युवतीचे कपडे

By Admin | Updated: July 19, 2016 23:58 IST2016-07-19T23:58:21+5:302016-07-19T23:58:21+5:30

धामणगाव गढी-चिखलदरा मार्गावरील प्रकाश तलावाच्या जंगलात युवतीच्या अंतर्वस्त्रासह अन्य कपडे विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Maiden clothes found in the forest of Dhamangaon | धामणगावच्या जंगलात आढळले युवतीचे कपडे

धामणगावच्या जंगलात आढळले युवतीचे कपडे

शोधमोहीम : पोलिसांनी जंगल पिंजून काढले
परतवाडा : धामणगाव गढी-चिखलदरा मार्गावरील प्रकाश तलावाच्या जंगलात युवतीच्या अंतर्वस्त्रासह अन्य कपडे विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजतापासून परतवाडा पोलिस त्या युवतीचा शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रानुसार, चिखलदरा मार्गावरील प्रकाश तलाव परिसरात धामणगाव गढी येथील दोन युवक सकाळी ८.३० वाजता मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांना जंगलात युवतीचे कपडे दिसले. त्यांनी पुढे शोध घेतला असता अंतर्वस्त्र आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
आठ तासापासून शोधमोहीम
परतवाडा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार किरण वानखडे, सहा. पोलीस निरीक्षक मुकूंद कवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पथकाने सुक्ष्म तपासणी चालविली असून त्यासाठी जंगल पिंजून काढले. वृत्त लिहिस्तोवर त्या युवतीचा शोध लागला नव्हता.
त्या अज्ञात युवतीवर अत्याचार करून तिला प्रकाश तलावात टाकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या अनुषंगाने गोताखोरांना तलावात उतरविण्यात आले. मात्र गळाला काहीच लागले नाही. नजीकच्या गावातील एखादी युवती बेपत्ता आहे का, या दिशेने परतवाडा पोलिसांनी शोध चाविला ंआहे. (प्रतिनिधी)

पर्यटक की स्थानिक
जंगलात अंतर्वस्त्रासह कपडे सापडल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलात हा प्रकार उघडकीस आल्याने सदर युवती पर्यटक की स्थानिक की परिसरातील रहिवासी ? याचा शोध सुरू असून कपडे फेकण्यामागच्या कारणाचा आणि कपडे कुणाचे याचा शोध युद्धस्तरावर घेतल्या जात आहे.

प्रकाश तलाव परिसरात मुलीचे कपडे संशयास्पद स्थितीत सापडले आहे. नेमका प्रकार काय, याबाबत तपास सुरू आहे.
- मुकूंद कवाडे
सहा. पोलिस निरीक्षक, परतवाडा.

Web Title: Maiden clothes found in the forest of Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.