माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: August 27, 2015 00:25 IST2015-08-27T00:25:05+5:302015-08-27T00:25:05+5:30

माहूली जहाँंगीर येथे मंगळवारी नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा ...

Mahuli stallion protest | माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध

माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध

दोषी पोलिसांवर कारवाई करा : युवक कॉंग्रेसची मागणी
अमरावती : माहूली जहाँंगीर येथे मंगळवारी नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुधवारी युवक कॉग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. आणी या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.
माहूली येथे एस.टी बस अपघातामुळे साहील गजानन डायरे (१२) वर्षीय बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात निर्माण झालेल्या तणावामुळे एस.टी बस महामंडळाची बस संतापाच्या भरात पेटविली. यानंतर येथे हिंसक परिस्थिती निर्माण झाली. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार यशोमती ठाकूर माहूलीचे सरपंच संजय नागोने, एडीओ प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, माजी सरपंच ज्योती ठाकरे व युवक कॉग्रेसचे पदाधिकारी यांनी जमावाला शांत करण्यासाठी पुढाकार घेतला असतांना परिस्थिती आटोक्यात आली. परंतु राज्य राखीव दलाच्या तुकडीने तसेच ग्रामिण पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर जमाव शांत झाल्यानंतरही लाठीहल्ला केला. यामध्ये आमदारांसह नागरिकांनाही मारहाण केल्याने युवक काँगे्रसने निषेध करुन दोेषींवर कारवाईची मागणी हरीष मोरे, रितेश पांडव, संजय नागोने, राजेश ठाकरे, समिर जवंजाळ सागर देशमुख, निलेश विश्र्वकर्मा, अनिकेत ढेंगळे, अभिजित बोके, वैभव वानखडे, उमेश वाकोडे आशिष खाकसे आदींनी केली आहे.

Web Title: Mahuli stallion protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.