महापालिकेत झोन सभापतीपदावर ‘महिला राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST2021-04-04T04:13:07+5:302021-04-04T04:13:07+5:30

अमरावती : महापालिकेच्या पाचपैकी चार झोन सभापतीपदावर महिलांची वर्णी लागली असून, केवळ झोन क्रमांक १ मध्ये संजय वानरे यांच्या ...

'Mahila Raj' for the post of Zone Chairperson in the Municipal Corporation | महापालिकेत झोन सभापतीपदावर ‘महिला राज’

महापालिकेत झोन सभापतीपदावर ‘महिला राज’

अमरावती : महापालिकेच्या पाचपैकी चार झोन सभापतीपदावर महिलांची वर्णी लागली असून, केवळ झोन क्रमांक १ मध्ये संजय वानरे यांच्या रुपाने पुरुष सभापतीपदी म्हणून निवड झाली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत झोन सभापतीपदाची निवणूक अविरोध झाली.

महापालिकेच्या विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक घेण्‍यात आली. यात महापालिकेच्‍या रामपुरी उत्‍तर झोन क्र.१ सभापतीपदी संजय वानरे, राजापेठ मध्‍य झोन क्र. २ सभापतीपदी नूतन भुजाडे, हमालपुरा पूर्व झोन क्र. ३ सभापती अस्‍मा फिरोज खान, बडनेरा दक्षिण झोन क्र.४ सभापती रेखा ओमप्रकाश भुतडा, भाजीबाजार पश्चिम झोन क्र. ५ सभापतीपदी नसीम बानो मोहम्‍मद अकील यांची अविरोध निवड करण्‍यात आली.

नवनियुक्त झोन सभापती तथा मिनी महापौरांचे महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहू, स्‍थायी समिती सभापती शिरीष रासने, महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृहनेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अब्‍दुल नाजीम अब्‍दुल रऊफ, गटनेता राजेंद्र तायडे, नगरसेवक संजय नरवणे, सुनील काळे, उपायुक्‍त सुरेश पाटील, नगरसचिव मदन तांबेकर आदींनी कौतुक केले.

Web Title: 'Mahila Raj' for the post of Zone Chairperson in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.