पंचायत समितीत ‘महिला राज’
By Admin | Updated: September 14, 2014 23:46 IST2014-09-14T23:46:37+5:302014-09-14T23:46:37+5:30
रविवारी झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसच्या सोनाली प्रशांत देशमुख तर उपसभापती पदी प्रहारचे गजानन मोरे यांची अविरोध निवड झाली.

पंचायत समितीत ‘महिला राज’
अचलपुरात काँग्रेस-प्रहार
अचलपूर : रविवारी झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसच्या सोनाली प्रशांत देशमुख तर उपसभापती पदी प्रहारचे गजानन मोरे यांची अविरोध निवड झाली.
अचलपूर पं.स. वर्तुळात दहा सदस्य असून त्यामध्ये पाच काँग्रेस, चार प्रहार व एक भाजप सदस्याचा समावेश आहे. अचलपूर तालुक्यातील गावांचा मेळघाट, दर्यापूर व अचलपूर अशा तीन मतदारसंघांत समावेश आहे. अशातच संभावित नेते वजा उमेदवारीचा प्रहारला वाढता विरोध पत्करत मार्ग काढण्यात आला. सभापतीपदी सोनाली देशमुख तर उपसभापती गजानन मोरे यांचे नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसचे पं.स. सदस्य हेमंत चांदूरकर, किसन दहीकर, मावळते सभापती ओमश्री घोरे, संजीवनी वानखडे, तर प्रहारचे दीपक धुरधर, मीनाक्षी ठाकरे, प्रितीताई घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी जल्लोष करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अमोल बोरेकर, जयदेवराव गायकवाड, राजेंद्र गोरले, साधुराम येवले, गंगाधर चौधरी, प्रकाश घोम, देवीदास घोम, जगतराव देशमुख, गणेश पटारे, रमेश लोळे, पंजाब इंगळे, अनिस सरपंच अनिल आकोडे, बब्बूभाई, युसूफ भाई, पुरुषोत्तम बोरकार, गौरव काळे आदींचा समावेश होता.
रविवारी निवडणूक असल्याने कार्यकर्त्याची अनुपस्थिती जानवत होती. तर निवडणूक अधिकारी तहसीलदार मनोज लोनकर, बीडीओ बाळासाहेब रायबोले लिपिक शे. युसूफ यांनी कामकाज पाहिले.
अमरावती,भातकुलीवर शिवेसेनेचा झेंडा
अमरावती : अमरावती व भातकुली पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये दोन्ही पंचायत समितीवर शिवसेनेने झेंडा फडकविला आहे. अमरावती पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेचे आशिष धर्माळे यांची विनविरोध निवड झाली असून भातकुली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवेसनेच्या सुनीता वानखडे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.
रविवारी पंचायत समिती निवडणूक शांततेत पार पडली. अमरावती व भातकुली पंचायत समितीच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता निवडणुकीला सुरुवात झाल्यावर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. अमरावती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे अनिल गंधे व आशिष धर्माळे यांंनी नामांकन दाखल केले होते. मात्र अनिल गंधे यांनी वेळेवर अर्ज मागे घेतल्याने आशिष धर्माळे यांची अविरोध निवड झाली. उपसभापतीसाठी शिवसेनेचे अनिल चांगोले व राष्ट्रवादीचे भास्कर गभणे यांनी नामाकंन दाखल केले होते. यामध्ये अनिल चांगोले यांनी अर्ज मागे घेतल्याने उपसभापती भास्कर गभणे विजयी झाले. यावेळी शिवसेनेच्या सुवर्णा वाकोडे, प्रहारच्या उज्वला उगले, क्रॉग्रेसच्या सुनंदा केचे, ज्योती यावलीकर असे सदस्य उपस्थित होते. भातकुली पंचायत समितीत सभापतीपदासाठी काँगे्रसचे जयंता देशमुख व शिवेसेनेच्या सुनीता वानखडे तर उपसभापतीकरिता राष्ट्रवादीचे अजीज पटेल व युवा स्वाभिमानीच्या संगीता चुनकीकर यांनी नामांकन दाखल केले होते. काँॅग्रेसचे व शिवसेनेचे तीन उमेदवार रिंगणात होते. यावेळी अजीज पटेल यांनी सेनेला पाठिंबा दिला. तर युवा स्वाभिमानीच्या संगीता चुनकीकर यांच्यासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली. दोन्ही गटाचे चार-चार उमेदवार झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरचिठ्ठी काढली. यामध्ये शिवसेनेच्या सुनीता वानखडे त्यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी संगीता चुनकीकर या विजयी ठरल्या. अमरावती पंचायत समितीसाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार सुरेश बगळे व समिती सचिव प्रमोद कापडे तर भातकुली पंचायत समितीत अध्यासिय अधिकारी अजितकुमार येळे व गटविकास अधिकारी एस.पी. थोरात यांनी कार्यभार साभांळला.