युवा स्वाभिमान संघटनेतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
By Admin | Updated: April 12, 2016 00:15 IST2016-04-12T00:15:39+5:302016-04-12T00:15:39+5:30
आ. रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांंंना अभिवादन करण्यात आले.

युवा स्वाभिमान संघटनेतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
अमरावती : आ. रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांंंना अभिवादन करण्यात आले. आ. रवी राणा यांनी पुतळ्याला माल्यार्पण करून नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
येथील चित्रा चौकात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आ. रवी राणा यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोपरांत भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असा शब्द त्यांनी याप्रसंगी दिला. महात्मा ज्योतीबा फुलेंचा पुतळा उड्डाणपूल बांधकामात जाणार असेल तर अगोदर फुलेंचा पुतळा शहरात दर्शनी भागात बसविण्यासाठी जागा मंजूर करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन ही मागणी शासन दरबारी पाठविली जाणार आहे. यावेळी राजेंद्र गवई, गणेश बेलसरे, श्रीकृष्ण बनसोड, विजय नागपुरे, नाना आमले, बाबुराव बेलसरे, अजय बोबडे, चंद्रशेखर कुरळकर, वामनराव सोनार, सुरेश सावरकर, प्रभाकर कुरळकर, मनोज अंबाळकर, श्रद्धा पाटील, सुयश श्रीखंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)