महात्मा गांधी मार्केट कोसळले, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:16+5:30
सन १९६४ मध्ये बांधण्यात आलेल्या या त्रिकोणाकार मार्केटमध्ये १२० दुकाने आहेत. ही दुर्घटना घडली असली मोठी जिवितहानी झाली असती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.२३ डिसेंबर १९६४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या मार्केटचे उद्घाटन केले होते, सुमारे १२ हजार चौ. फुटाचा हा भूखंड काही व्यापाºयांनी सोसायटी करुन विकत घेतला व मालकी तत्वावर दुकाने बांधली.

महात्मा गांधी मार्केट कोसळले, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात जयस्तंभ चौक, रॉयली प्लॉट भागातील माहात्मा गांधी मार्केटचा एक भाग गुरुवारी पहाटे ३.३० वाजता कोसळल्याने चौकीदारासह अन्य एक व्यक्ती जखमी झाला. या घटनेत मार्केटमधील कपडा व ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची १५ दुकाने जमीनदोस्त झालीत व लगतची चार दुकानेही क्षतिग्रस्त झाली आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी महत्प्रयासाने ढिगाऱ्यात दबलेल्या दोघांना बाहेर काढून त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल केले.
सन १९६४ मध्ये बांधण्यात आलेल्या या त्रिकोणाकार मार्केटमध्ये १२० दुकाने आहेत. ही दुर्घटना घडली असली मोठी जिवितहानी झाली असती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.२३ डिसेंबर १९६४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या मार्केटचे उद्घाटन केले होते, सुमारे १२ हजार चौ. फुटाचा हा भूखंड काही व्यापाºयांनी सोसायटी करुन विकत घेतला व मालकी तत्वावर दुकाने बांधली. या तीनमजली मार्केटमध्ये १२० चे वर दुकाने आहेत.यापैकी ३० ते ३५ दुकानेच सुरू आहेत. अन्य दुकाने गोदाम म्हणून वापरली जातात. त्यामुळे या घटनेत किती नुकसान झाले याचा नेमका अंदाज व्यापाऱ्यांनाही नाही. या दुर्घटनेत न्यू विजय ईलेक्ट्रानिक्स यांची तीन दुकाने भारत हॅन्डलूम यांची दोन, दुर्गासाडी, शिरवानी, सुधीर धाराणी, श्यामलाल, प्रकाश टेक्सटाईल, राजकुमार पिजांनीव नागवानी आदींचे मोठ्या प्रमाणीत नुकसान झाल्याचे सुनील तरडेहा व सतिश गोयल यांनी सांगितले. अग्निशमनच्या कर्मचाºयांनी अर्धा तासात पहिल्या व अडीच तास आवाजाच्या दिशेने मलबा काढल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले. यामध्ये फायरमन उताणे, भरत राठोड, तायडे, गौरव दंदे, गोविंद घुले, संजय ाौहान, शोएब खान, शेख तौशीफ व शुभम सोनटक्के आदी सहभागी होते.
स्ट्रक्चरल आॅडीटसाठी दुकानदारांना नोटीस
या इमारतीला ५८ वर्ष झाले असल्याने या सर्व गाळेधारकांनी एकत्रपणे संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करणेर महत्वाचे असतांना हा प्रकार झालेला नाही. महापालिकेद्वाराही दर्शनी भाग सुस्थितीत दिसत असल्याने गाळेधारकांना नोटीस दिल्या नसल्याचे कार्यकारी अभियंता सुहास चव्हान यांनी सांगीतले. यासाठी मार्केटमधील सर्व दुकानदारांना आता नोटीस बजावण्यात येणार आहे व स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.