शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज मतदान ! कुणी रोख, दारू, प्रलोभन देत असेल तर डायल करा ११२

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:05 IST

पोलिस आयुक्तांचे आवाहन : शहरात ४४ मतदान केंद्रे संवेदनशील

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होत आहे. शहर आयुक्तालयातील एकूण २७७ इमारतींत ७९१ मतदान केंद्रे आहेत. पैकी ज्या इमारतीत पाच व पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, अशी ४४ ठिकाणे पोलिस दप्तरी संवेदनशील असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सोमवारी दिली. यादरम्यान कुणीही रोख रक्कम, दारू वा अन्य प्रलोभन देत असल्यास पोलिसांशी डायल ११२ सह नजीकचे पोलिस ठाणे, ठाणे इन्चार्जला माहिती देण्याचे आवाहन सीपी रेड्डी यांनी केले. सोबतच कुणीही आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबीदेखील त्यांनी दिली.

दरम्यान, शहर आयुक्तालयातील ७९१ ठिकाणी होणारे मतदानस्थळी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांसह पॅरामिलिटरी फोर्सला शहर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय सूचना केल्या. कमांडिंग ऑफिसरला एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले असून मध्य प्रदेशवरून आलेल्या होमगार्डसह सीआरपीएफ व अन्य फोर्सला हिंदी भाषेतील सूचना पुस्तके देण्यात आली आहेत. दरम्यान, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सेक्टर व ठाणेनिहाय पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असून अतिरिक्त नाकाबंदीदेखील केली जाणार आहे कुठेही काहीही झाल्यास, बूथवर काही घडल्यास अवघ्या पाच मिनिटांत अतिरिक्त पोलिस यंत्रणा तेथे पोहोचेल, अशी ग्वाहीदेखील सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. यावेळी पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यादेखील उपस्थित होत्या. 

८.९८ कोटींचा मुद्देमाल जप्त गेल्या १५ ऑक्टोबर दुपारपासून आदर्श आचारसंहिता अमलात आली. १६ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या महिन्याभराच्या काळात शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तपासणीदरम्यान सुमारे ८.९८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २ कोटी ८१ लाख रुपये रोख, सुमारे ५.६० कोटी रुपयांचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. नाकाबंदी गबंदी व कारवाईत १८ लाख रुपये किमतीची सुमारे ३० हजार लिटर दारू पकडण्यात आली, तर ७.५३ लाख रुपये किमतीचा ३८ किलो गांजादेखील जप्त करण्यात आला.

३७८ पैकी २९२ जणांनी केली शस्त्रे जमा पोलिस आयुक्तालयाकडून ३७८ जणांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे. पैकी ३७२ परवानाधारकांकडे अग्निशस्त्रे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यापैकी २९२ शस्त्रे जमा करवून घेण्यात आली आहेत, तर ८४ जणांना त्यातून सूट देण्यात आली आहे. त्यात बँक, व्यापारी, गार्ड, डॉक्टर्स व अन्य काहींचा समावेश आहे. त्यांचा निवडणुकीशी सुतराम संबंध नाही.

"विधानसभेची मतदानप्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. ड्रोन पेट्रोलिंगदेखील केली जात आहे." - नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानAmravatiअमरावती