शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:34 IST

अंबाबरवा वन अभयारण्यातील टी-२३ वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू 

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अंबाबरवा वन  अभयारण्यातील टी-२३ हा वाघ मध्य प्रदेशातील जंगलात मृतावस्थेत आढळून आला. आठ ते नऊ वर्षाच्या या वाघाचा नैसर्गिक मृत्यू १० ते १५ दिवसांपूर्वी झाला असून, त्याचे संपूर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत मिळाले आहे. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर विभागांतर्गत खकनार रेंजमधील अंबाझोल बीट अंंतर्गत वनखंड क्रमांक ३६१ मध्ये या वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. हे घटनास्थळ अंबाबरवा अभयारण्याच्या सीमेपासून पचोरी गावालगत चार किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. 

मृत वाघाचे सर्व अवयव व कातडी घटनास्थळावर आढळून आल्याने मध्य प्रदेश टास्क फोर्स या प्रकरणाची चौकशी करणार आहे.  घटनेची माहिती बुऱ्हाणपूर वनअधिकाऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला दिली. दप्तरी असलेल्या माहितीवरून व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या वाघाची ओळख पटवून घेतली. मृत वाघ टी-२३ आहे. अंबाबरवा-वान अभयारण्यात २०१६-१७, २०१७-१८ २०१८-१९ मध्ये नोंद आढळून आली आहे. वाघाची ओळख पटल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी घटनास्थळावर जाऊन आलेत.  अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात वाघाला कोरोनाची लागण बघता, टी-२३ च्या मृत्यूची कारणमीमांसा करताना कोविड-१९ च्या अनुषंगानेही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

प्रत्येक व्याघ्र प्रकल्पांतर्गत तेथील वाघांचा फोटो अल्बम कॅमेरा ट्रॅपमुळे उपलब्ध आहे. त्यांना नंबर देण्यात आले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत टी-१, टी-२ ते टी-५० असे वाघाला क्रमांक आहेत. वाघाच्या अंगावरील काळ्या पट्ट्यांवरून देशभर वाघांची स्वतंत्र ओळख निश्चित होते. एका वाघाच्या अंगावरील हे काळे पट्टे अन्य कुठल्याही वाघाशी जुळत नाहीत.  - डॉ. जयंत वडतकर मानद वन्यजीव रक्षक, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTigerवाघ