शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संरक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उत्तर प्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:47 IST

महाराष्ट्रात वाघ संरक्षणाचे योग्य नियोजन बघता महाराष्ट्राचे हे मॉडेल आत्मसात करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्राची मदत घेतली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या मॉनिटरिंगबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यशाळेतून धडे देणार आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ वनाधिकारी देणार धडेआधुनिक पद्धतीचा अभ्यास करणार

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्रात वाघ संरक्षणाचे योग्य नियोजन बघता महाराष्ट्राचे हे मॉडेल आत्मसात करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्राची मदत घेतली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या मॉनिटरिंगबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यशाळेतून धडे देणार आहेत.राज्यात सध्या २५० च्यावर वाघ शिल्लक असून एकट्या विदर्भात ही संख्या १७५ च्या आसपास आहे. महाराष्ट्रात वाघांबाबत विदर्भ समृद्ध म्हणावा लागेल. कारण ११ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व आहे. विदर्भात वाघांचे मॉनिटरिंग त्याचे नियोजन हे खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने सुरू असल्याने वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील ४२ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ‘टॉप टेन’मध्ये मेळघाट व ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांनी स्थान प्राप्त केले आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ताडोबा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नियोजनाची दखल घेतली आहे. अलीकडे मध्यप्रदेशच्या तुलनेत उत्तराखंड, उत्तरप्रदेशमध्ये वाघांची संख्या वाढत आहे. वाघांचे संवर्धन, संरक्षण आणि नियोजन हे महाराष्ट्राप्रमाणे करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्रातील वन्यजीव विभागाला वाघांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निमंत्रित केले आहे.वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व काही अधिकारी उत्तरप्रदेशात गेले असून, तेथे वाघांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्यांना महाराष्ट्र पॅटर्न समजावून सांगणार आहेत.

काय आहे महाराष्ट्राचा पॅटर्न?महाराष्ट्रात एकट्या विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने सध्या महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. शासनाने व्याघ्र प्रकल्पांना स्वायत्तता देत अधिकारी व वनकर्मचाऱ्यांची संख्या वाढविली. जीपीएस प्रणाली, शासकीय मोबाईल, कॉलर आयडी, कॅमेरा ट्रॅपिंग, कोड नंबर, यामुळे वाघांची संख्या अचूक टिपण्यास मदत झाली. प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांचे लोकेशन जीपीएस एम ट्रॅक पद्धतीने घेतल्याने कोणता वाघ कोणत्या क्षेत्रात भ्रमंती करतोय, यासाठी संगणकाचा वापर केला जात आहे.

व्याघ्र संवर्धन फोर्स व कृत्रिम पाणवठेसीमा सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मेळघाट, ताडोबा, पेंच या तीनही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संवर्धन फोर्स तैनात केले आहेत. २४ तास बंदूक खांद्यावर घेऊन हे दल संवेदनशील भागात गस्त घालून वाघांचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळे शिकारीला काहीसा आळा बसला आहे. यासाठी वन विभागात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. आदिवासी क्षेत्रातील तरूणांना प्राधान्य देण्यात आले आहे. उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार करून त्यावर करडी नजर ठेवली जात आहे.‘‘दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन, संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. वाघांच्या संरक्षणाचा महाराष्ट्र पॅटर्न उत्तर प्रदेशात राबविला जात असल्याचे समाधान आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक,वन्यजीव विभाग महाराष्ट्र

टॅग्स :Tigerवाघ