शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद; दोन्ही राज्यपालांची बैठक सुरू; कोश्यारींविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 14:17 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे.

अमरावती - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटक सीमावादावरुन सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. एकीकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावरील  जिल्ह्यांबाबत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेण्यात येत आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सुरू झाली आहे. 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी, शिंदवाडा, बैतुल, बुरानपुर, खंडवा, हारगोन, बडवाणी आणि अलीराजपूर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून थेट मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूक होते. अमरावती जिल्ह्यातून बैतूल खंडोबा बऱ्हाणपूर शिंदवाडा या जिल्ह्याचा दळणवळण होत असते. त्यावरुन, वाद निर्माण न होण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे राज्यपाल एकत्र बैठकीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांना शिवसैनिकांनी विरोधक केला आहे. 

अमरावतीत शिवसैनिकांचा विरोध

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांची सध्या सीमाप्रश्नावरुन बैठक सुरू आहे. त्या ठिकाणी शिवसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवल असता, शिवसैनिकांकडून बैठकीच्या दिशेने चपला दाखविण्यात आल्या. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावती