शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

Maharashtra Election 2019 ; पाच लाख कुटुंबांना आयोगाची ‘व्होटर गाईड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोग आग्रही आहे. त्याअनुषंगाने मतदार जागृतीवर अधिक भर देण्यात येतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये त्याला कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक लहान-सहान बाबीची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देबीएलओद्वारे वितरण प्रक्रिया : २४.४९ लाख मतदारांना घरपोच ‘फोटो व्होटर स्लिप’, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मतदान प्रक्रियेची माहिती मतदारांना व्हावी, यासाठी आयोगाद्वारे माहिती पुस्तिका (व्होटर गाइड) तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील किमान २० लाख कुटुंबापर्यंत ही पुस्तिका पोहचविण्यात येत आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांद्वारे पुस्तिका वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.विधानसभा निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोग आग्रही आहे. त्याअनुषंगाने मतदार जागृतीवर अधिक भर देण्यात येतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये त्याला कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक लहान-सहान बाबीची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. मतदार यादीत नोंद नोंदविण्याच्या प्रक्रियेपासून मत कसे नोंदवाल, याची माहिती देण्यात आलेली आहे. मतदान केंद्रे, मतदान अधिकारी, बोटाला इंक लावणे, इव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदान केंद्र कसे शोधाल आदी माहिती या पुस्तिकेद्वारे देण्यात आलेली आहे.मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे, त्याला मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक शोधण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे ‘फोटो व्होटर स्लिप’चे वाटप प्रत्येक मतदारांना करण्यात येत आहे. आठही मतदारसंघांतील २४.४९ लाख मतदारांपर्यंत ही चिठ्ठी पोहचविली जात आहे. यामध्ये संबंधित मतदान केंद्र, मतदारांचे छायाचित्र, नाव, वय, पत्ता, सबंधित विधानसभा क्षेत्र, संबंधित मतदारयादीचा क्रमांक आदी माहिती आहे व मतदानाचे दोन दिवसांपूर्वी या चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याने मतदाराला घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १९ लाख मतदारांपर्यत या फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आलेले आहे.दरम्यान ‘स्वीप’ अभियानांतर्गत जिल्हाभरात मतदार जनजागृतीचे काम जोरात सुरू आहे. शाळा, महाविद्यालयासह गर्दीच्या ठिकाणी जागृती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त गावागावांतील चौकाचौकांत मतदार जागृती फलक लावण्यात आलेले आहेत.मतमोजणीची ठिकाणे निश्चितमतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात ठिकाणे निश्चित झालेली आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात चांदूर रेल्वे येथील शासकीय आयटीआय, बडनेरा व अमरावती मतदारसंघासाठी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाम, तिवास येथे कृषिउत्पन्न बाजार समितीचे गोदाम, दर्यापूर येथे वैभव मंगल कार्यालय, मेळघाटात धारणी येथे बुलडाणा अर्बन बँकेचे गोदाम, अचलपूर येथे कल्याण मंडपम् तर मोर्शी येथे शासकीय धान्य गोदामात मतमोजणीची प्रक्रिया २४ आॅक्टोबरला सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पहिल्यांदा एका टेबलवर एआरओच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिकांची गणना होईल. नंतर आठ वाजतानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.मेळघाटातील ३५३ पार्ट्या उद्या होतील रवानामेळघाट मतदारसंघातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील मतदान केंद्रे दुर्गम भागात आहे. मतदान २१ आॅक्टोबरला होत असताना त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ तारखेला ३५३ पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात येणार आहेत. यासाठी ४२ एसटी बस व ३४ जीप एवढी वाहने लागणार आहेत. साधारणपणे १३७३ अधिकारी-कर्मचाºयांचा मतदान प्रक्रियेत सहभाग राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर या पार्ट्यांना आवश्यक किट पुरविली जाणार आहे. यामध्ये टॉर्च, बॅटरी, बिस्कीट व आवश्यक वस्तू राहणार आहेत. मेळघाटातील १३३ मतदान केंद्रांवर कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. त्यामुळे संपर्कासाठी वायरलेस, वॉकी-टॉकी आदी सुविधा देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त रनरदेखील असणार आहे. प्रसंगी वनविभागाच्या वॉकी-टॉकीदेखील वापरल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.२६२८ मतदान केंद्रांवर या सुविधाआठही विधानसभा मतदारसंघांतील २६२८ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, आणि स्वयंसेवक, ईव्हीएमवर ब्रेल लिपीची सुविधा, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सुविधा, महिलांद्वारा संचालित १० मतदान केंदे्र, प्रत्येक केंद्रावर मतदार मदत केंद्राची सुविधा, प्रथमोपचार सुविधा, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची व्यवस्था, दिव्यांग मतदारांना घर ते मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी मोफत वाहनांची सुविधा राहणार आहे.दहा केंद्रे महिलांद्वारे संचालितधामणगाव रेल्वे मतदारसंघातील चांदूर रेल्वे येथे दोन सखी मतदान केंद्रे, बडनेरा मतदारसंघातील शारदानगर स्थित लाटेबाई शाळेत दोन, अमरावती मतदारसंघातील सेंट थॉमस शाळेत एक, तिवसा मतदारसंघात एक, दर्यापूरमध्ये लढ्ढा नगर परिषद मराठी शाळेत एक, मेळघाट मतदारसंघातील धारणी येथे एक, अचलपूर मतदारसंघातील सुबोध ज्युनियर कॉलेज येथे एक, तर मोर्शी मतदारसंघातील भारतीय महाविद्यालयात एक अशी एकूण दहा सखी मतदान केंदे्र स्थापित करण्यात येणार आहेत.

टॅग्स :amravati-acअमरावती