शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; प्रलोभन : रोख, साड्या, दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती/चांदूर रेल्वे : विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने रोख रकमेसह साड्या व दारूचे वाटप सुरू ...

ठळक मुद्देस्थिर निगराणी पथकाची कारवाई : अमरावती, परतवाडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/चांदूर रेल्वे : विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने रोख रकमेसह साड्या व दारूचे वाटप सुरू असल्याचे पोलीस कारवाईवरून निदर्शनास आले आहे. गुरुवारी रात्री चांदूर रेल्वे येथील बायपास स्थित चेकपोस्टवर एका कारमधून ७ लाख १३ हजार ७५० रुपयांची रोख, वडाळी स्थित एसआरपीएफच्या बॉर्डर सीलिंग पॉइंटवर कारमधून ६१ साड्यांसह बीअर व दारूच्या बॉटल असा एकूण १ लाख ३५ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल, तर परतवाडा-बैतूल रोडवरील खरपी तपासणी नाक्यावर निवडणूक पथकाने १ लाख ३० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली.अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावरील बायपास चेकपोस्टवर १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२.५० वाजताच्या सुमारास एमएच २७ बीई ५९५४ या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील संदेश कुचेरिया यांच्या मालकीच्या त्या वाहनातील एका बॅगमध्ये ७ लाख १३ हजार ७५० रुपये रोख आढळून आली. यामध्ये दोन हजार रुपयांच्या १२, दोनशे रुपयाच्या ११९, शंभर रुपयांच्या ७६३ नोटा, पाचशे रुपयांच्या ११६२ नोटा व ५० रूपयांच्या १७३ नोटा होत्या. सदर रक्कम आपलीच असल्याचा दावा धामणगाव रेल्वे येथील औषधविक्रेते गोपाल लोंदे यांनी केला. ते वाहनातसुद्धा होते. परंतु, त्यांच्याकडे सदर रकमेबाबत कुठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे ही रक्कम पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आली. ती रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. पथकप्रमुख सतीश गोसावी, अनिल चौरे, राजेश्वर मलमकार, योगेश वंजारी, महेश प्रसाद यांनी केली. वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प येथील बॉर्डर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अमरावतीवरून चांदूर रेल्वेकडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ०२ सीआर १०५ ची तपासणी केली. यावेळी कारच्या डिक्कीमध्ये विविधरंगी ६२ साड्या, बीअर व विस्कीच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी चालक प्रवीण वसंत दवडे (३०, रा. राहुलनगर) याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय बळावल्याने कारमधील तो मुद्देमाल जप्त केला. फ्रेजरपुरा ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र ढोके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी साड्या, बीअर, दारू असा एकूण १ लाख ३५ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एएसआय सुरेंद्र ढोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रवीण दवडेसह अन्य दोघांविरुद्ध भादंविच्या कलम १७१ (ई) नुसार गुन्हा नोंदविला.खासगी ट्रॅव्हल्समधून तस्करीपरतवाडा-बैतूल रोडवरील खरपी तपासणी नाक्यावर निवडणूक पथकाने १ लाख ३० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. यात २०० बॉटल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही दारू मध्य प्रदेशातून परतवाडा येथे येत असलेल्या साजनदास नामक खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून आणली जात होती. त्या ट्रॅव्हल्ससह चालकालाही ताब्यात घेण्यात आले.कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांकडून शस्त्र जप्तकोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून तीन आरोपींकडून चाकू जप्त केला. सुबोध अनिल गणेश, रोहित ज्ञानेश्वर गवई (दोन्ही रा. सिद्धार्थनगर) व प्रज्वल सुनील खरे (रा. विलासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शस्त्रासह एक दुचाकी असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक धावडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उमक, पोलीस कर्मचारी जुनेद, नीलेश, इम्रान यांनी गुरुवारी कोतवाली हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. दरम्यान, ४/२५ आर्म अ‍ॅक्ट व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजळील शस्त्र व दुचाकी जप्त केली. यासोबत कलम १२२ मधील आरोपी शेख शमीम शेख हसन (रा. अलमास नगर, बडनेरा) यांच्यावर कारवाई केली.

टॅग्स :amravati-acअमरावती