शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो.

ठळक मुद्देनिवडणूक रणसंग्राम : आठही मतदारसंघांत पकडला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ ऑक्टोबरला ५ वाजता संपणार आहे. १७ ऑक्टोबरपासून अवघे तीन दिवस प्रचारासाठी शिल्लक राहत असल्याने उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व समर्थकांनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली आहे. ‘कोण आला रे कोण?’ अशा घोषणांनी गल्लीबोळात रॅली निघत आहे. पदयात्रेत डोक्यावर टोपी, गळ्यात दुपट्टा आणि उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर पिंजून काढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील इलेक्शन फिव्हर वाढविले आहे. त्यांच्या जोडीला दिग्गजांच्या होणाऱ्या सभांमुळे प्रचाराची रंगत आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो. मित्रमंडळी, पाहुणे यांना गाठून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे. युवक संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांचा मेळावा यांची मांदियाळी सुरू आहे. निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कार्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. १९ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे राहिलेल्या कालावधीत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. उमेदवार स्वत: नाही पोहोचला तरी घरातील व्यक्ती मतदारापर्यंत जावी, या पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले जात आहे.आठही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी अडीच ते तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार, कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. अंतिम टप्प्यात प्रचाराचा फेरआढावा घेतला जात आहे. एकगठ्ठा मतदान असलेल्या ठिकाणी पुन:पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे. उमेदवार व समर्थक रात्री २ पर्यंत जाग्रण करीत आहेत. प्रचाराची वेळ संपल्यावर रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होते. त्यात दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन केले जाते. आहे. २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.सायंकाळची प्रचार रॅली, कार्नर बैठकींना पसंतीअलीकडे शेतीकामे जोरात सुरु असल्याने उमेदवार गावात पोहचले की, घरी मतदार मिळत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली आहे. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.गुप्त बैठकींना वेगसकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उमेदवार प्रचार रॅली, कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटी यात व्यस्त आहेत. मात्र, रात्री १० नंतर निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत गुप्त बैठकांनासुद्धा वेग आला आहे. विजयाचे प्लॅनिंग, एकगठ्ठा मते कशी मिळतील, याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गावखेड्यात राजकीय दबदबा असलेल्या पुढाऱ्यांना या गुप्त बैठकीत महत्त्व दिले जात आहे. मतदान चार दिवसांवर आले असताना अशा खलबतांना वेग आल्याचे चित्र सर्व मतदारसंघांत आहे.सोशल मीडियाची साथदिवसभरात केलेला दौरा, मिळालेला पाठिंबा, घेतलेल्या बैठकी, भाषण आणि जाहीरनामे यांची इत्थंभूत माहिती मतदारांना मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. दुसºया दिवशीचे नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंंत पोहचविले जात आहे. परिसरानुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. त्या-त्या परिसरात उमेदवारांच्या प्रचाराची माहिती दिली जात आहे. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने सोशल मीडियाची मोठी साथ उमेदवारांना प्रचारासाठी लाभली आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती