शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

Maharashtra Election 2019 ; राजेश वानखडे यांच्या नामांकनाला लक्षवेधी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणा निनादल्या.

ठळक मुद्देमहायुतीच्या नेत्यांचा सहभाग : तिवसा मतदारसंघात भगवा फडकविण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शिवसेना, भाजप, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश वानखडे यांनी शुक्रवारी दुपारी तिवसा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शवून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भगव्या झेंड्यांनी आणि 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणांनी तिवसानगरी दुमदुमली होती.यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार साहेबराव तट्टे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिलीप जाधव, बडनेरा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीती संजय बंड, भाजपा नेत्या निवेदिता चौधरी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव अतुल इंगळे, कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक विकास इंगोले, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, नाना नागमोते, भाजपचे नेते विवेक गुल्हाने, रविराज देशमुख, जयंत आमले, उमेश घुरडे, इंगळे, नितीन हटवार यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणा निनादल्या.भगवा फडकविण्याचे आवाहनशिवसेना-भाजपला पसंती मिळत असल्याचे चित्र आतापर्यंत बघत आहोत. विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी राजेश वानखडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी खासदार अनंत गुढे यांनी केले. यावेळी प्रीती बंड यांनी संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीने राजेश वानखडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत करा आणि तिवसा मतदारसंघात भगवा फडकवा, असे आवाहन केले. शिवराय कुलकर्णी, साहेबराव तट्टे, दिलीप जाधव, श्याम देशमुख यांनीदेखील तिवस्यात भगवा फडकविण्याचे आवाहन केले.

टॅग्स :BJPभाजपा