शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

अंबा-एकवीरा देवी मंदिरातील महाप्रसाद भाविकांसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:21 IST

अंबा-एकविरा देवी संस्थानतर्फे पत्रिका वाटून घेण्यात येणारा महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा खुला करण्यात आला . नवरात्रोत्सवात आतापर्यंत दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद खुला करण्यात आल्याने सर्वसामान्य भक्तगणांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे१० हजार भक्तगणांना लाभ : पत्रिका वाटपाचा कार्यक्रम आता बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबा-एकविरा देवी संस्थानतर्फे पत्रिका वाटून घेण्यात येणारा महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा खुला करण्यात आला . नवरात्रोत्सवात आतापर्यंत दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद खुला करण्यात आल्याने सर्वसामान्य भक्तगणांना दिलासा मिळाला आहे.अंबानगरीला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबा-एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. राज्यभरातील भाविकभक्त अंबा-एकविरेच्या दर्शनासाठी येतात. परजिल्ह्यातील भाविकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था करण्यातयेते. नवरात्रोत्सवातील महाप्रसाद पत्रिका वाटून केले जात होते. त्यामुळे अनेक भाविक महाप्रसादापासून वंचित राहत होते. गोरगरिब नागरिक मोठ्या आशेने महाप्रसादासाठी मंदिरात येत होते. मात्र, पत्रिका नसल्यामुळे त्यांना महाप्रसाद मिळत नव्हता. देव सर्वांसाठीच आहे, मग महाप्रसादात भेदभाव कशाला, असा प्रश्न भाविकांना पडला होता. लोकभावना जाणून 'लोकमत'ने अंबा-एकविरा देवी संस्थाच्या पत्रिका वाटप कार्यक्रम लोकदरबारी मांडून हा मुद्दा रेटून धरला होता. अखेर संस्थान पदाधिकाऱ्यांनी सामजंस्याची भुमिका घेत महाप्रसाद खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदाचा महाप्रसाद खुला करण्यात आला . मंदिरात येणाºया प्रत्येक भाविकांना आता महाप्रसादाचा लाभ होत आहे. एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादाचा नऊ ते दहा हजार भाविकांनी लाभ घेतला असून, या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंबा एकविरा अमरावतीकरांचे नव्हेतर राज्याच्या कानाकोपºयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.पत्रिका वाटून महाप्रसादाला बोलाविण्याची पध्दत आता बंद करण्यात आली आहे. महाप्रसाद सर्वांसाठी खुला करण्यात आला असून, आतापर्यंत नऊ ते दहा हजार भाविकांनी लाभ घेतला आहे.- रमेश गोडबोले, अध्यक्ष, एकविरा देवी संस्थान