हनुमंत लुंगे यांना महागुरू पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:46+5:302021-06-11T04:09:46+5:30
अमरावती : राष्ट्रीय क्रीडा आणि शारीरिक फिटनेस बोर्डाद्वारे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा ...

हनुमंत लुंगे यांना महागुरू पुरस्कार
अमरावती : राष्ट्रीय क्रीडा आणि शारीरिक फिटनेस बोर्डाद्वारे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयाचे प्राचार्य हनुमंत लुंगे यांना नुकताच महागुरू पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय शारीरिक फिटनेस बोर्डाचे अध्यक्ष, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा माजी क्रीडामंत्री पडी रिचो यांच्या हस्ते हनुमंत लुंगे यांना पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी लुंगे यांना २०२० मध्ये डी. जे. इंटरनॅशनल रिसर्च फाऊंडेशनद्वारे बेस्ट रिसर्चर तसेच क्रीडा क्षेत्रातील एक्सलन्स इन एक्स्टेन्शन २०१९ या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांना राज्य शासनाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारही मिळाला आहे.
हनुमंत लुंगे यांनी क्वालालंपूर (मलेशिया), सिंगापूर, टोकियो, पोखरा (नेपाळ), दिल्ली, भोपाळ येथील भारतीय ॲथलेटिक्स व डाॅजबाॅल संघाचे प्रशिक्षक तसेच तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या ते महाराष्ट्र डाॅजबाॅल संघटनेच्या महासचिव पदावर कार्यरत असून, अनेक क्रीडा संघटनांमध्ये पदाधिकारी आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात स्थान पटकावणारा धनुर्धर प्रवीण जाधवसह अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू घडविले आहेत.