अमरावतीत आज महामोर्चा

By Admin | Updated: September 2, 2016 23:58 IST2016-09-02T23:58:15+5:302016-09-02T23:58:15+5:30

ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झालो.

Maha Morcha in Amravati today | अमरावतीत आज महामोर्चा

अमरावतीत आज महामोर्चा

अमरावती : ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झालो. यातील मुख्य आरोपी शंकर महाराजांना अटक करुन नार्को टेस्ट घेण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी मातंग समाजाचा महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाला विविध संघटना, राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा आहे.
स्थानिक राजकमल चौकातून सकाळी ११ वाजता हा महामोर्चा निघणार आहे. ज्येष्ठ नेते दादासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. राजकमल चौकस्थित वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. पुढे जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट, इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले जाईल. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. मोर्चात मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Maha Morcha in Amravati today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.