१६ लाखांचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळी

By Admin | Updated: March 7, 2017 02:20 IST2017-03-07T02:20:36+5:302017-03-07T02:20:36+5:30

एक आरोपी बडनेरा येथील असून, उर्वरित तीन चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती

In Madhya Pradesh, a gang of 16 lakh jewelery looters | १६ लाखांचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळी

१६ लाखांचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळी

अकोला, दि. ६- शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरिअर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चार अज्ञात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर हे दागिने लुटले होते. यामधील एक आरोपी बडनेरा येथील असून, उर्वरित तीन चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आहे.
प्रशांत कुरिअरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरिअर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हे कुरिअर बॉय म्हणून कामाला आहेत. ते मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी रोजी रात्री मुंबई येथून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एम एच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले असता पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी थांबवून काकड यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. काकड यांच्याकडील रोकड आणि दागिने लुटीची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांचा संशय त्यांच्यावरच होता. त्यामुळे शहा आणि काकड यांची कसून चौकशी पोलिसांनी केली. त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरू केल्यानंतर ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मात्र, या टोळीचा म्होरक्या हा बडनेरा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना कळले असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील तीन चोरट्यांच्या शोधासाठी एक पथक मध्य प्रदेशात रवाना केले असून, हे पथक टोळीतील आरोपींचा शोध घेत आहे.

Web Title: In Madhya Pradesh, a gang of 16 lakh jewelery looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.