माधुरी मडावी नव्या महापालिका उपायुक्त
By प्रदीप भाकरे | Updated: July 10, 2024 17:27 IST2024-07-10T17:25:16+5:302024-07-10T17:27:27+5:30
Amravati : ११ जुलै रोजी अमरावती महानगरपालिका उपायुक्तपदावर होणार रूजू

Madhuri Madavi New Municipal Deputy Commissioner
अमरावती : यवतमाळ जिल्हयातील दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अमरावती महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर आपली बदली करण्यात येत असून, ११ जुलै रोजी अमरावती महानगरपालिका उपायुक्तपदावर रूजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कास यांच्या स्वाक्षरीने १० जुलै रोजी काढण्यात आलेल्या आदेशातच त्यांना दिग्रस मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. यवतमाळ येथील मुख्याधिकारीपदाचा कार्यकाळ त्यांनी गाजविला होता. दरम्यान, मडावी यांच्या रूपाने अमरावती महापालिकेलाप्रथमच चार उपायुक्त मिळाले आहेत. येथे महापालिका आस्थापनेवरील योगेश पिठे, नरेंद्र वानखडे व राज्यसेवेतील जुम्मा प्यारेवाले उपायुक्त आहेत.