मध्यप्रदेशात निर्मित अवैध दारू पकडली

By Admin | Updated: October 28, 2016 00:14 IST2016-10-28T00:14:07+5:302016-10-28T00:14:07+5:30

येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यप्रदेशात निर्मित होणारी अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर धासडत्र राबविले.

Made in illicit liquor in Madhya Pradesh | मध्यप्रदेशात निर्मित अवैध दारू पकडली

मध्यप्रदेशात निर्मित अवैध दारू पकडली

एक्साईजची कारवाई : सीमेवरील चार गावांमध्ये धाडसत्र
अमरावती : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यप्रदेशात निर्मित होणारी अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर धासडत्र राबविले. सीमेवरील चार गावांमध्ये ही कारवाई करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनानुसार अवैध दारू विक्रीविरुद्ध धडक कारवाई क रण्यात आली आहे. एक्साईज विभागाने अवैध, बनावट मद्य विक्री, निर्मिती, वाहतूक विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. एक्साईजचे निरीक्षक लांडगे, केडीया व श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली. चिखलदरा तालुक्यातील गंगारखेड येथे राजेश शामलाल मोरले (३८) नीळकंठ आठवले (४०) यांच्याविरुद् गावठी हातभट्टी, देशी दारु बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. चुर्णी येथील ओमप्रकाश भोजनालयात छापा टाकून आरोपी राम धोतरे (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मध्यप्रदेशात निर्मित देशी व विदेशी दारु ताब्यात घेतली.

Web Title: Made in illicit liquor in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.