मशीन पोहोचल्या; दोन दिवसांत सुरू होणार दोन ‘कोराना लॅब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:01:00+5:30

तपासणीसाठी नागपुरात पाठवावे लागणारे नमुने आता अमरावतीतच तपासले जातील. अमरावतीत दोन कोरोना लॅबची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाºया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीच ही माहिती गुरुवारी दिली. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी मशीनची टेस्टिंगही गुरुवारी घेतली.

The machines arrived; Two 'Korana Labs' to open in two days | मशीन पोहोचल्या; दोन दिवसांत सुरू होणार दोन ‘कोराना लॅब’

मशीन पोहोचल्या; दोन दिवसांत सुरू होणार दोन ‘कोराना लॅब’

ठळक मुद्देपालकमंत्री : चाचपणीही झाली, विनाविलंब नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीकरांसाठी गुड न्यूज आहे. कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठीच्या दोन प्रयोगशाळा दोनेक दिवसांत अमरावतीकरांच्या सेवेत रूजू होणार आहेत.
घशातील स्रावात असलेले कोरोनाचे अस्तित्व तपासणाऱ्या दोन मशीन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत गुरुवारी दाखल झाल्यात. त्यांची चाचपणीही करण्यात आली. लगोलग ‘आयसीएमआर’ (इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) ची मान्यता प्राप्त होणार आहे.
तपासणीसाठी नागपुरात पाठवावे लागणारे नमुने आता अमरावतीतच तपासले जातील. अमरावतीत दोन कोरोना लॅबची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाºया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीच ही माहिती गुरुवारी दिली. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी मशीनची टेस्टिंगही गुरुवारी घेतली.


तपासणीसाठीचे अहवाल नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवावे लागायचे. अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याने संभ्रम निर्माण होत असे. लॅब सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून पाठपुरावा केला. डीपीसीतर्फे निधी उपलब्ध करण्यात आला. विद्यापीठ आणि पीडीएमसीमध्ये लवकरच लॅब कार्यान्वित होत आहेत.
- यशोमती ठाकूर,पालकमंत्री

शासनाकडून मशीन व किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीएमआरकडून मान्यता मिळताच नमुन्यांचे टेस्टिंग सुरू केले जातील. दोन दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या मशीनची टेस्टींग आमच्या विशेषज्ञांकडून करण्यात आली आहे.
-मुरलीधर चांदेकर, कुलगुरू


विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये यंत्रे दाखल झाली आहेत. आयसीएमआरच्या मान्यतेनंतर लगेच थ्रोट स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरु होईल. विद्यापीठाने याकरिता आयसीएमआरला प्रस्ताव पाठविला आहे. आम्हीसुद्धा पाठपुरावा करीत आहोत. मंजुरी मिळताच तपासणीला सुरूवात होईल.
-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
 

Web Title: The machines arrived; Two 'Korana Labs' to open in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.