निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना ३० कोटींचा मोबदला

By Admin | Updated: February 1, 2016 00:11 IST2016-02-01T00:11:11+5:302016-02-01T00:11:11+5:30

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेढी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घरांचा मोबदला वितरित करण्यात येणार आहे.

Lower compensation for project affected people Rs. 30 crores | निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना ३० कोटींचा मोबदला

निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना ३० कोटींचा मोबदला

२००० ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : दुसऱ्या आठवड्यात निधीचे वितरण
अमरावती : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेढी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घरांचा मोबदला वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक १२ (२) च्या नोटीस एक-दोन दिवसात प्रसूत केल्या जाणार आहेत. अळणगाव येथील ५६० कुटुंबांना घराचा मोबदला म्हणून ३० कोटी रुपयांचे वितरण होत असल्याने त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील पुनर्वसन कठोरा शिवारात प्रस्तावित असून भूखंड वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अळणगावातील ग्रामस्थांना त्यांच्या घराच्या मोबदल्याची प्रतीक्षा लागून राहिली होती.
सन २००७-०८ पासून घरांची संयुक्त मोजणी, मूल्यांकन, छायाचित्रण ही प्रक्रिया सुरू होती. त्यावर आता मोबदल्याचे धनादेश स्वीकरण्यासाठी निघत असलेल्या १२ (२) नोटीसने शिक्कामोर्तब केले आहे. १२ (२) नोटीसमध्ये संबंधितांचा घरक्रमांक, क्षेत्रफळ, मोबदल्याची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रांसह स्वत: उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
अळणगाव येथील ५६० कुटुंबांना त्यांच्या घरांचा मोबदला मिळण्याचा मार्ग दीर्घ कालावधीनंतर प्रशस्त झाला आहे. (प्रतिनिधी)

१२ (२) नोटीसचे वाटप
सोमवार किंवा मंगळवारी कलम १२ (२) ची नोटीस संबंधित यंत्रणेला सुपूर्द केली जाईल. प्रकल्पबाधितांना या नोटीसप्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे प्रत्यक्ष मोबदला वितरणाला सुरुवात होईल.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे
घरांचा मोबदला स्वीकारण्यासाठी संबंधित ग्रामस्थांची उपस्थिती अनिवार्य आहे. हा मोबदला मिळविण्यासाठी अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना काही कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. त्यात प्रामुख्याने खालील बाबी असतील.
निवडणूक मतदानाचे ओळखपत्र किंवा आधारकार्डची मूळप्रत व झेरॉक्स प्रती
खातेदार मृत असल्यास सक्षम दिवाणी न्यायालयाचे वारसाचे प्रमाणपत्र
आपसातील व्यवहार असल्यास फेरफराची नक्कल व खरेदीची प्रत
राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक
रेव्हेन्यू तिकीट - ४ (१ रुपयांचे)
नवीन ८ - अ
कर पावतीची प्रत

Web Title: Lower compensation for project affected people Rs. 30 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.