व-हाडातील धरणांत अत्यल्प जलसाठा !

By Admin | Updated: July 1, 2016 00:05 IST2016-07-01T00:05:34+5:302016-07-01T00:05:34+5:30

काटेपूर्णात सहा दिवसांचा साठा; बुलडाण्यातील चार प्रकल्पांची पातळी शून्यावर; पावसाळ्य़ात जलसंकट तीव्र!

Low-water reservoir in the dam! | व-हाडातील धरणांत अत्यल्प जलसाठा !

व-हाडातील धरणांत अत्यल्प जलसाठा !

राजरत्न सिरसाट/अकोला
पश्‍चिम वर्‍हातील धरणांच्या पानलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणांची पातळी आता कमालिची खालावली असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३७ कोटी लिटर (0.४३ टक्के)म्हणजे सहा दिवसांचाच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्हय़ातील तर चार प्रकल्पाची पातळी शून्य टक्के असल्याने पावसाळ्य़ात वर्‍हाडातील जलसंकट तीव्र झाले आहे. दरम्यान, काटेपूर्णा धरणात १ सें.मी.जलपातळीत वाढ झाल्याने सर्वांंच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. इतर धरणांची मात्र दारू ण परिस्थिती आहे.
मागीलवर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने धरणांच्या जलपातळीत वाढ झाली नव्हती. परिणामी, यावर्षी पाणी वितरण तोलून मापून करावे लागले. यावर्षी पाऊस चांगला व दमदार होणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने सर्वांंच्याच आशा पल्लवित झाल्या; परंतु पावसाळ्य़ाचे तीन आठवडे संपले तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पूरक पाऊस झाला नाही. परिणामी, धरणांची जलपातळी तळाला पोहोचली आहे.
* बुलडाण्यातील ४ धरणं शून्य टक्के
बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा या मोठय़ा धरणांसह पलढग, मस व कोराडीत शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाण्यातीलच नळगंगा व पेनटाकळी या मोठय़ा धरणांत अनुक्रमे ३.३३ व २.४५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तोरणा ३.0४ व उतावळी मध्य प्रकल्पात ५.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मसमध्ये ९.१५ तर ज्ञानगंगा प्रकल्पात १६.३0 टक्के जलसाठा आहे.
**अकोल्यातील दगडपारवा कोरडे, उमा शून्य टक्के
अकोला जिल्हय़ातील दगडपारवा धरण मागच्या वर्षापासून कोरडेच असून, उमा मध्यम धरणात शून्य टक्के साठा आहे. मोर्णा ३.३८ तर निर्गृणा धरणात ३.५४ टक्केच जलसाठा आहे.
*** वाशिम जिल्ह्यातील एकबूर्जी धरणात २.६ तर अडान धरणात १३.७१ जलसाठा शिल्लक आहे.

काटेपूर्णा धरणात १ सें.मी.जलसाठय़ात वाढ !
अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात १ सें.मी. ने वाढ झाली; परंतु धरणातील जलसाठय़ात चांगली वाढ होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.

Web Title: Low-water reservoir in the dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.