शिवणी रसुलापूर : येथील शिवणी रामपूर येथील कृषी पंपाला महिनाभरापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांना ओलीत करणे गरजेचे असताना वीजेअभावी विद्युत पंप बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्युत विभागाकडे वारंवार लेखी विनंती अर्ज करूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांनी अमरावती-यवतामळ महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. या निवेदनावर चंद्रशेखर गावंडे, पवन उघडे, राजीव गावंडे, राजेश गाडेकर, रामेश्वर गाडेकर, विशाल भंडागे, देवगिरी गौरी, कैलास गावंडे, सुरेंद्र वैद्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कमी दाबाने वीजपुरवठा, रबी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST