किमान ऊर्जा आणि लाकडाऐवजी गोवºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:56 IST2017-09-02T00:55:47+5:302017-09-02T00:56:06+5:30

कमीतकमी ऊर्जा व लाकडाऐवजी गोवºयांचा उपयोग करून पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

Low energy and wood instead of iv | किमान ऊर्जा आणि लाकडाऐवजी गोवºया

किमान ऊर्जा आणि लाकडाऐवजी गोवºया

ठळक मुद्देअंत्यविधीसाठी नवे तंत्रज्ञान : अमरावतीत ‘वुडलेस क्रिमेशन’चा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कमीतकमी ऊर्जा व लाकडाऐवजी गोवºयांचा उपयोग करून पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील पाच स्मशानभूमिंमध्ये प्रायोगिक तत्वावर यातंत्रज्ञानाचा वापर करण्याचा संकल्प महापालिका आयुक्तांनी केला आहे. हे तंत्रज्ञान नेमके कसे, त्याची वैशिष्ट्ये काय, यासाठी ४ सप्टेंबरला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी महापालिकेत ‘प्रेझेंटेशन’ करणार आहेत.
अंत्यविधीसाठी पारंपारिक पद्धतीने लाकडाचा उपयोग न करता गोवºयांचा उपयोग करण्याचे ‘वसुधा’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. सध्याच्या विद्युतदाहिनीमध्ये विजेचा वापर करुन मानवांच्या पार्थिवावर दाहसंस्कार केले जातात. मात्र, अजुनही नागरिकांनी ही पद्धत फारशी स्वीकारलेली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पारंपारिक पद्धतीवरच भर दिला जातो.
तासाभरात अंतिमसंस्कार
अमरावती : एका शवदहनासाठी ३०० ते ५०० किलो लाकडांचा वापर होतो. शव जाळल्यावर उरलेली रक्षाही पर्यावरणाला पुरक नाही. रक्षेमध्ये सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि मर्क्युरीची मात्रा अधिक असते. ती राख नदीचा प्रवाह प्रदूषित करते. त्यावर उपाययोजना, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून परंपरेला धक्का न लागू न देता अनुरूप शववाहिनी साकारण्यात आली आहे. पार्थिव शरिराच्या अंत्यविधीसाठी पर्यावरणपुरक सयंत्र बनविण्यात आले आहे. यात कमीत कमी गोवºया वापरून आणि कमीतकमी ऊर्जेचा वापर करुन संपूर्ण अंत्यविधी ६० ते ७० मिनिटांमध्ये पार पाडला जाऊ शकतो. यामध्ये संपूर्णत: गोवºयांचा समावेश असलेली राख मिळते. ९ सप्टेंबरला अकोला महापालिकेत हे तंत्रज्ञान वापरून तेथील स्मशानभूमिमध्ये अनुरूप शवदाहिनीचा प्रयोग होणार आहे. अमरावती मनपात ४ सप्टेंबरला दुपारी १ वाजता या तंत्रज्ञानाची माहिती अधिकारी-पदाधिकाºयांना दिली जाणार आहे. ‘वुडलेस क्रिमिशन’चा (लाकूडविरहित अंत्यसंस्कार) हा प्रयोग हिंदू स्मशानभूमिसह विलासनगर, फ्रेजरपुरा, नवसारी व बडनेरा स्मशानभूमित करण्याचा मानस आयुक्त हेमंत पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Low energy and wood instead of iv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.