पोहरा जंगल बनले प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान

By Admin | Updated: September 4, 2014 23:28 IST2014-09-04T23:28:53+5:302014-09-04T23:28:53+5:30

शहरातील वर्दळीपासून लांब जाऊन एकांत शोधणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी पोहरा जंगल हे आवडीचे ठिकाण बनले आहे. येथील शांत, एकांत निसर्गरम्यस्थळी अनेक जोडपी बसलेली आढळतात. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर

Lovely jungle became lavatores' shelters | पोहरा जंगल बनले प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान

पोहरा जंगल बनले प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान

अमोल कोहळे - पोहराबंदी
शहरातील वर्दळीपासून लांब जाऊन एकांत शोधणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी पोहरा जंगल हे आवडीचे ठिकाण बनले आहे. येथील शांत, एकांत निसर्गरम्यस्थळी अनेक जोडपी बसलेली आढळतात. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांपासून प्रेमीयुगुलांचा हैदोस सुरू आहे.
पोहरा जंगलात सर्वत्र हिरवळ असल्याने प्रेमीयुगुल या परिसरात आश्रयाला येत आहेत. पोहरा हे जंगल अतिशय घनदाट असून निसर्गाच्या कुशीत वसलेला हा परिसर पावसाळ्यात हिरवाईने नटतो. येथील नैसर्गिक वातावरण प्रफुल्लीत करते. अमरावतीहून निघाल्यानंतर थोडे अंतर पार केले की निसर्गाची किमया जाणवायला लागत असल्याने अश्लील चाळे करण्यासाठी येथे युवक-युवतींची सतत वर्दळ दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी या मार्गावरुन ये-जा करतात. पोहरा, चिरोडी, मानखेडा, सावंगा, गोविंदपूर, बोडणा, पिपळखुटा, चांदूरेल्वे या ठिकाणी कार्यरत शिक्षक व कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. परंतु तोंडाला दुपट्टा बांधून असणारे युवक-युवती कुणाचीही तमा न बाळगता रस्त्यावरच अश्लील चाळे करतात. अमरावती येथील प्रेमीयुगुल झाडाचा आडोसा घेऊन जंगलात नको त्या अवस्थेत दृष्टीस पडतात.
महाविद्यालयात शिकायला जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडणाऱ्या युवतींना टवाळखोर हेरतात व आपल्या प्रेम जाळ्यात अडकवितात. एकदा प्रेमसूत जुळले की युवतींना फिरायला जाण्याचे आमिष दाखवून या जंगलाकडे आणले जाते. अमरावतीपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावरुन हे जंगल सुरू होते. झाडा-झुडपाच्या आडोशाला प्रेमीयुगुलांचे जोडपे, निवांतपणे गप्पा मारताना आढळून येत आहेत.
दररोज पन्नास ते शंभर पे्रमीयुगुल या मार्गाने ये-जा करतात. याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. या प्रकाराकडे शहरातील पालकवर्गाने जातीने लक्ष घालण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Web Title: Lovely jungle became lavatores' shelters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.