शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 6:16 PM

तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले.

- गोपाल डहाकेमोर्शी (अमरावती) : तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. लग्नानंतर मात्र जातीचा, रूपाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे तीन आठवड्यांतच तिच्या लग्नाचा विस्कोट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नांदायचे आहे, अशी मागणी तिने मोर्शी पोलिसांकडे केली आहे.धामणगाव गढी येथील १९ वर्षीय ऐश्वर्या (कल्पनिक नाव) चे फेसबूकवर मोर्शी शहरातील दुर्गानगर येथील रहिवासी अभिजित सुधाकर ठाकरे (२९) याच्याशी ११ महिन्यांपूर्वी मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील भेद गळून पडले. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. तो जुमानत नसल्याचे पाहून मोर्शी पोलीस ठाणे गाठले. हे समजताच तिची मनधरणी करीत त्याने पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र, त्याच वेळी १७ महिने आईकडे राहण्याची लेखी अट तिच्याकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर घेतली. एवढेच नव्हे तर तिने नकार देताच अभिजितने शिवीगाळ करीत थप्पड लगावल्या आणि पट्ट्याने मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती धामणगावला निघून गेली. इकडे अभिजितने आईच्या कानावर सदर प्रकार घालताच ठाकरे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्याची आई माजी भाजप तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणला गेला. याशिवाय मुलगी खाटीक, तर अभिजित हा कुणबी समाजाचा. त्यामुळे हे प्रकरण जातीय वळणावर गेले. अभिजितला फितवून हे लग्न मोडायचेच, असा चंग ठाकरे कुटुंबीयांनी केला होता. याची भनक मुलीला पडताच तिने १८ मे रोजी तडक दुर्गानगर गाठले. दरम्यानच्या काळात अभिजित पसार झाला, तर सासू-सासरे घरात घेण्यास तयार नसल्याने तिने ठाकरे कुटुंबाच्या घरासमोर डेरा टाकला आहे. १ व ३ जून रोजी भर पावसात ती तेथेच होती. मला माझ्या नवऱ्यासोबत नांदायचे आहे, अशी तिची एकमेव मागणी आहे.दरम्यान, तीन आठवड्यातच लग्न मोडीत निघालेल्या या युवतीने १ जून रोजी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध शिवीगाळ व शारीरिक-मानसिक छळ करून त्रास दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाकडे मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.मला नांदायचे आहेमला माझ्या आई-वडिलांनी या प्रकरणानंतर घराबाहेर काढले आहे. अभिजितशी कायदेशीर लग्न झाले आहे आणि त्याच्यासोबत संसार करायचा आहे. पोलीस तरी मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा ऐश्वर्याने सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

टॅग्स :Facebookफेसबुक