भररस्त्यांत गावगुुंडांचे मद्यप्राशन !

By Admin | Updated: September 26, 2016 00:20 IST2016-09-26T00:20:08+5:302016-09-26T00:20:08+5:30

अंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे यानगरीला सुसंस्कारांची देण आहे.

Lots of grapevine drink! | भररस्त्यांत गावगुुंडांचे मद्यप्राशन !

भररस्त्यांत गावगुुंडांचे मद्यप्राशन !

नियम, कायद्याची ऐशीतैशी : पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढले मवाल्यांचे मनोबल, शांतता-सुव्यवस्था धोक्यात
संदीप मानकर  अमरावती
अंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे यानगरीला सुसंस्कारांची देण आहे. ही संताची नगरीसुद्धा मानली जाते. परंतु या नगरीच्या लौैकिकाला गालबोट लावण्याचा प्रकार काही समाजकंटक वरचेवर करीत असतात. अलीकडे काही गुंड तरूणांचे टोळके नियमांची ऐशीतैशी करीत भररस्त्यात सर्वांच्या डोळयांदेखत मद्यप्राशन करतात. हा प्रकार अमरावतीच्या पोलिसांना माहीत असूनही कोणतीच कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.
येथील व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर क्लासिक कमर्शियल कॉम्प्लेकसमध्ये एक वाईनशॉप आहे.

मध्यवस्तीत मवाल्यांचा हैदोस
अमरावती : भरवस्तीतील दारूच्या दुकानात सायंकाळी ६ वाजतापासून गुंड प्रवृत्तीचे तरूण एकत्र येतात. या दारू दुकानात मद्यप्राशन करतात. हा सर्व प्रकार प्रतिष्ठित नागरिकांच्या वस्तीलगत घडत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होते. विशेषत: महिलांची गोची होते. हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो.
एक तर भरवस्तीत दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी द्यायलाच नको. कारण, परिसरातील रहिवाशांना भयंकर त्रास सोसवा लागतो. याठिकाणी तर अनेक गुंड प्रवृतीचे तरुण एकत्र येऊन दारू विकत घेतात. ‘डिस्पोजल ग्लास’, थंड पाण्याचे पाऊच आणि चकना विकत घेऊन या मार्केटच्या फुटपाथवर उघडयावर दारुची पार्टी करण्यात येते. अनेकदा हे चित्र पाहायला मिळते. एखाद्या नागरिकांने या टोळक्याला याबाबत हटकले असता त्यांनाच अश्लील शिवीगाळ प्रतिष्ठित नागरिकांनी हटकले, तर त्यांनाच अश्लील शिवीगाळ केली जाते.
इतकेच नाही तर दारूच्या नशेत हे मवाली तरूण कोणासोबतही भांडण उकरून काढतात. त्यामुळे हा प्रकार असह्य होऊनही शांतताप्रिय नागरिक या टोळक्याच्या वाटेला जात नाहीत. अमरावती पोलिसांनाही हे सगळे उघड्या डोळ्यांनी दिसते. तरीही कोणतीच कारवाई केली जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेथे हा प्रकार घडतो, त्याठिकाणी एक डीबी आहे. त्या डीबीवर दारूच्या खाली पाण्याच्या तसेच डिस्ट्रील वॉटरच्या बॉटल ठेवलेल्या दिसून येतात. येथे एक पानटपरी आहे. तेथे हे तरूण थांबलेले असतात. येथे बेधडक धुम्रपानही केले जाते. अवैध गुटखाही विकण्यात येतो. शेजारीच असलेल्या नालीत दारू ढोसून रिकाम्या बाटल्या फेकल्या जातात. त्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Lots of grapevine drink!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.