शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वॉटस्अपमुळे मिळाला हरवलेला चिमुकला; दिवाळीत उजळले आनंददीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 20:55 IST

Amravati News boy missing दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या. व्हॉट्सअपवरील माहितीच्या आधारे या हरविलेल्या चिमुकल्याचा शोध लागला.धोतरखेडा येथील प्रेम संजू काकडे (२ वर्ष) हा आजीसोबत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी परतवाड्यातील गुजरी बाजारात आला होता. दरम्यान आजीच्या हातातून निसटला आणि गर्दीत दिसेनासा झाला. शोधूनही तो सापडला नव्हता.प्रेमचे वडील संजू काकडे (रा. धोतरखेडा) यांनी धोतरखेड्याचे पोलीस पाटील सुरेश कोगदे यांच्या मदतीने परतवाडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस शिपाई आशिष भुंते, पोलीस पाटील सुरेश कोगदे, प्रेमचे वडील संजू काकडेसह नातेवाईकांनी हरविलेल्या प्रेमचा मध्यप्रदेशसह लगतच्या परिसरात शोध घेतला. पण, आठ दिवसांपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.दरम्यान सुरेश कोकदे यांनी पोलीस पाटलांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर फोटोसह हरविलेल्या प्रेमची माहिती टाकली. पोलिसांनीही शोधपत्रक जारी केले. अखेर प्रेमची माहिती मिळाली आणि दिवाळी व बालकदिनी तो घरी पोहचता झाला. अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरणालगतच्या भोपापूर येथून दिवाळीच्या दिवशी पालक व पोलीस पाटलांसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.६ नोव्हेंबरला प्रेम नामक चिमुकला जैतादेही येथील एका महिलेला परतवाडा पोष्ट आॅफीस चिखलदरा स्टॉपवरील आॅटो स्टॉपवर सायंकाळी रडताना दिसला. त्याला त्या महिलेने घरी नेले. त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. ज्याचा असेल तो शोधत शोधत घ्यायला येईलच. या आशेवर असतानाच दारसिंभेचा साळा राजेश जामुनकर (रा. जैतादेही) याला ही माहिती मिळाली. त्या आधारे दरसिंभे याने त्या मुलाला आपल्या भोपापूर येथील मुलीकडे नेले. तेथून त्याची माहिती धोतरखेड्याला पोहचविली व हरवलेला प्रेम आपल्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहचता झाला.ऐन दिवाळीच्या तोंडावर मुलगा हरवल्याचे दु:ख शब्दापलीकडचे असतानाच दिवाळीच्या दिवशी तो सुखरूप घरी परतल्याचा आनंद कुटुंबीयांसाठी गगनभर ठरले.हरवलेल्या मुलाला परतवाड्यातून आपल्या घरी नेताना किंवा निदान दुसऱ्या दिवशी तरी त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी होती. आठ दिवस गावपातळीवर पोलीस पाटील, सरपंच यांनाही माहिती दिली नाही, हे योग्य नाही. पण बालकदिनी त्याला सुखरुप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करता आले. शेवट अखेर गोड झाला.- सुरेश कोगदे,पोलीस पाटील, धोतरखेडा, ता. अचलपूर.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप