जरुड येथे सिलिंडरचा स्फोट तीन लाख रुपयांचे नुकसान

By Admin | Updated: July 15, 2015 00:21 IST2015-07-15T00:21:10+5:302015-07-15T00:21:10+5:30

स्थानिक गाडगेबाबा चौकातील ज्ञानेश्वर गोरडे यांचे घरातील सिलिंडरने अचानक भडका घेतल्याने ..

Loss of cylinder explosion at Jairad worth Rs 3 lakh | जरुड येथे सिलिंडरचा स्फोट तीन लाख रुपयांचे नुकसान

जरुड येथे सिलिंडरचा स्फोट तीन लाख रुपयांचे नुकसान

 जरूड : स्थानिक गाडगेबाबा चौकातील ज्ञानेश्वर गोरडे यांचे घरातील सिलिंडरने अचानक भडका घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तीन लाख रुपयांचे नुकसान होऊन घराची राखरांगोळी झाली. परंतु युवकाच्या सतर्कतेमुळे सिलिंडरचा स्फोट होण्यापासून वाचल्याने अनेकांचे प्राण वाचले.
स्थानिक गाडगेबाबा चौकातील ज्ञानेश्वर गोरडे यांचे घरात सकाळी आठ वाजता दरम्यान स्वयंपाक सुरु असतांना अचानक सिलिंडरचा भडका उडाला. यावेळी घरातील माणसे शेतावर कामाला गेली होती तर केवळ सासू-सूना असल्याने एकच घाबगुंडी उडाली. यातच आग विझविण्याच्या प्रयत्नात सुनेने पाणी टाकल्याने भडका मोठा झाला होता. आरडाओरड होताच रवी गोरडे हे बाहेरुन आंत जावून आग विझविण्याचा प्रयत्न केला असता यांचा चेहरा आणि छातीवरील भाग जळाला. सिलिंडरचा स्फोट होईल या भीतीने कोणीही समोर जात नसतांना परिस्थतीचे गांभीर्य पाहून रिंकेश नामदेव राजस या २५ वर्षीय युवकाने धाडसाने सिलिंडरवर रेतीचा मारा करुन रेतीचा ढिग रचला. आणि क्षणार्धात सिलिंडरचा भडका कमी झाला परंतु याचवेळी घराने आग पकडल्याने या आगीत घराची राखरांगोळी झाली. यामध्ये तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

समयसूचकतेमुळे परिसर बचावला !
आगीची माहिती होताच रिंंकेश राजस हा २५ वर्षीय युवक काय झाले ते पाहण्यासाठी गेला असता गोरडे परिवाराच्या घरातील नेमकी आग कशाने लागली हे समजताच जिवाची पर्वा न करता आंत जावून सिलिेडरवर रेती टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. रेतीमुळे आगीची तीव्रता कमी झाली आणि सिलिंडर बाहेर काढण्यात यश आले.

Web Title: Loss of cylinder explosion at Jairad worth Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.