पाह्य वं माय, फोटो काढला न्‌ निघून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST2021-07-02T04:09:59+5:302021-07-02T04:09:59+5:30

त्याचे झाले असे, की अमरावती शहरातील शंकरनगर मार्गावरील एका ठिकाणी गुरुवारी पहाटे महापालिकेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने धूरळणी केली. तोे ...

Look, my photo was taken and gone | पाह्य वं माय, फोटो काढला न्‌ निघून गेला

पाह्य वं माय, फोटो काढला न्‌ निघून गेला

त्याचे झाले असे, की अमरावती शहरातील शंकरनगर मार्गावरील एका ठिकाणी गुरुवारी पहाटे महापालिकेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने धूरळणी केली. तोे कर्मचारी ज्या व्यक्तीसोबत आला, त्याने केवळ एका ठिकाणी त्याचे छायाचित्र काढले आणि अवघ्या तीन ते चार मिनिटांत ते तेथून रफूचक्कर झाले. हे दुरून न्याहाळणाऱ्या एका महिलेने तोंडाचा पट्टा सुरू केला - ‘पाह्य वं माय, फोटो काढला न्‌ निघून गेला’. घराबाहेर अंगणात पाणी टाकणाऱ्या शेजाऱ्यांना ऐकू जावे, एवढा ‘दम’ तिच्या सुरात होता. मग, शेजाऱ्यांनीदेखील ‘हे अस्सेच करतात’ पुष्टी जोडली. संबंधित नगसेवक व अमरावती महापालिकेच्या नावाने शिमगा करण्यात आला तो वेगळा. त्या विशिष्ट ठिकाणीच डासांचा उच्छाद आहे का, अशी कुजबुजदेखील महिला वर्गात ऐकू आली.

प्रदीप भाकरे, अमरावती

Web Title: Look, my photo was taken and gone