शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi : मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ...
2
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा PM पदाची घेतली शपथ; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
3
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : एक तास शिल्लक अन् पावसाची एन्ट्री! न्यू यॉर्कवरून Live Video 
4
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
5
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
6
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
7
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
8
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
9
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
10
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
11
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
12
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
13
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
14
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
15
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
16
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
17
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
18
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
19
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
20
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रग्रहण’२७ जुलै रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:06 PM

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे.

ठळक मुद्दे‘ब्लड मून’ संबोधन : स्पर्शकाळ ते मोक्ष दरम्यान तीन तासांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे. या ग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटांची राहणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.भारतात २७ जुलै रोजी रात्री ११.५४ वाजता चंद्रग्रहण लागेल. २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्र्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो व सूर्य - पृथ्वी-चंद्र या तीनही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकुच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे असतो. दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. यावेळी चंद्राची भ्रमणपातळी आयनिक पातळीशी ५ अंशांचा कोन करतो. पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका रेषेत येऊ शकत नाही, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.२७ जुलैला मंगळ पृथ्वीच्या जवळमंगळ ग्रह हा २७ जुलै रोजी अगदी सूर्यासमोर राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर हे सरासरी कमी असते. पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर सरासरी १३ कोटी ६८ लक्ष ६७ हजार ६५७ कि.मी. आहे. परंतु प्रतियुती काळात हे अंतर ५ कोटी ७५ लक्ष कि.मी. राहील. सरासरी २६ महिन्यांनी सूर्य-मंगळ प्रतियुती असते. याआधी २२ मे २०१६ रोजी सूर्य - मंगळ प्रतियुती झाली होती. यानंतर ६ आॅक्टोबर २०२० रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी मंगळ हे अंतर ६ कोटी २० लक्ष कि.मी. राहील.आयर्न आॅक्साईडमुळे मंगळ ग्रह लालमंगळ ग्रहावर आयर्न आॅक्साईडचे प्रमाण अधिक असल्याने हे ग्रह नेहमी लाल दिसते. या ग्रहाला एकूण दोन चंद्र आहेत. मंगळाचा व्यास ६,७९५ कि.मी. आहे. याला सूर्यभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास ६८७ दिवस लागतात. २० जुलै १९७६ आणि ६ आॅक्टोेबर १९७६ रोजी व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ या जुळ्या मानवरहित यानांनी मंगळाच्या मातीला प्रथम स्पर्श केला. या यानांनी जवळजवळ ११ महिन्यांचा प्रवास केला होता. २७ जुलै रोजी सूर्य मावळल्यावर लगेच पूर्व क्षितिजावर मंगळ ग्रह दिसेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल व हा लाल रंगाचा असल्याने सहज ओळखतादेखील येईल.मानवी जीवनावर ग्रहणाचा परिणाम नाहीया विज्ञानयुगातसुद्धा ग्रहणासंदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रुढ आहेत. अशा ग्रहणात जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, ग्रहण झाल्यावर दान करावे, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. सर्व खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.