शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा

By गणेश वासनिक | Updated: April 5, 2024 19:29 IST

महायुती, महाविकास आघाडीकडे समान चित्र; राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले

अमरावती : लोकशाहीचा महासंग्राम सुरू झाला आहे. राज्यात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत निळ्या-भगव्या पताका. नामांकन रॅली, प्रचार सभा असो की नेत्यांचे रोड शो, एवेच नव्हे तर उमेदवारांच्या मतदारांशी भेटीगाठीदरम्यान सामाजिक समरसता दर्शविण्यासाठी या पताका आसमंतात उंचावल्या जातात. यामध्ये राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले गेल्याचे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चवथ्या टप्प्यात १३ मे, तर पाचव्या टप्पा २० मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. तापमान ४२ ते ४४ आणि सूर्य दरदिवशी आग ओकत असला तरी विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना प्रचार करावाच लागत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांच्यातच प्रामुख्याने लढत आहे. प्रचार सभा वा उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमा, होर्डिंग्ज, पुतळे प्रामुख्याने लावण्यात येत आहे. विशेषत: विदर्भात महायुती असो वा महाविकास आघाडीचा उमेदवार, त्यांच्या गळ्यात पक्षीय दुपट्ट्यांऐवजी भगवे, निळे दुपट्टे ठळकपणे निदर्शनास यावेत, याचे भान राखले जात आहे. 

सभा, मेळाव्यातही भगवे, निळ्या झेंड्यांचा बोलबालामहायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेना, रिपाइं (आठवले गट), पीरिपा (कवाडे गट) यांच्यासह ११ पक्ष-गट सामील आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे सेना, रिपाइं (आंबेडकर गट), उपेंद्र खोब्रागडे (खाेरिपा), भीमशक्ती संघटना सोबत आहेत. विशेषत: काँग्रेस, भाजप उमेदवारांच्या प्रचार सभा, मेळावे आणि रॅलींमध्ये पक्षाच्या झेंड्यांपेक्षा भगव्या, निळ्या झेंड्यांचाच बोलबाला दिसून येत आहे.

डोक्यावरील टोपी लक्षवेधीलोकसभा निवडणूक प्रचारात भगव्या, निळ्या झेंड्यांची क्रेझ असताना अलीकडे उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोपीसुद्धा मतदारांचे लक्ष वेधत आहे. त्यातही ही टोपी भगवी, निळी असून विदर्भात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवार सामाजिक समीकरण आपल्या बाजूने जुळवून आणण्यासाठी शक्कल लढवित आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४amravati-pcअमरावतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४