विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ‘लोकमत’चा अमूल्य वाटा!
By Admin | Updated: January 21, 2017 00:18 IST2017-01-21T00:18:29+5:302017-01-21T00:18:29+5:30
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत शाळा, कुटुंबाप्रमाणे लोकमत वृत्तपत्राचा अमूल्य वाटा असल्याचे मत मेघे ग्रुप स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या संचालिका आभा मेघे यांनी व्यक्त केले़

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ‘लोकमत’चा अमूल्य वाटा!
आभा मेघे : ‘संस्कार मोती’चे बक्षीस वितरण
धामणगाव रेल्वे : मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत शाळा, कुटुंबाप्रमाणे लोकमत वृत्तपत्राचा अमूल्य वाटा असल्याचे मत मेघे ग्रुप स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या संचालिका आभा मेघे यांनी व्यक्त केले़
'लोकमत'द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती’स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल़पी़धामंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माधुरी कडू, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या व्यवस्थापिका गीता सूर्यनारायण, मुख्याध्यापक अतुल पाटील, जवाहर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पुरस्कार कार्तिकी मिलिंद देशमुख, द्वितीय उत्कर्षा जगदीश महात्मे, तृतीय अश्विनी योगेश गायगोले यांनी पटकावला, प्रोत्साहनपर बक्षीस तुषार प्रवीण चिंचे, यश अनिल भगत, वेदांत मंगेश सरोदे, गौरी चौबे, वेदांत गावंडे, शिवम शिरभाते, अनुश्री पेलागडे, अमृता चौधरी, सोनाक्षी धकाते, विधी प्रवीण दोड, निमिषा इंगोले यांनी पटकावले. (तालुका प्रतिनिधी)