उपक्रम : बारावीनंतरच्या करिअरसंदर्भात मार्गदर्शनअमरावती : ‘लोकमत’ आणि ‘नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी ‘लोकमत उडाण’ करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक हॉटेल रामगिरी इंटरनॅशनल येथे करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये नर्सी मोन्जी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई या संस्थेचे तज्ज्ञ यांचेमार्फत ‘बारावीनंतर काय आणि विद्यार्थ्यांसमोरचे नवे पर्याय’ या विषयांवर मार्गदर्शन होतील. इंजिनिअरिंंग, बिझनेस मॅनेजमेंट, पायलट, फार्मासिस्ट, फायनान्स, मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबतही ते मार्गदर्शन करतील. ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी काय करावे?, कोणत्या वाटा चोखाळाव्यात, याबाबत सविस्तर सांगितले जाईल. विद्यार्थी आणि पालकांना व्याख्यानासाठी मोफत प्रवेश राहील. माहितीसाठी ८९५६५४४४८, ९८५०३०४०८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विद्यार्थ्यांना बक्षिसे जिंकण्याची संधीसेमीनारला उपस्थित विद्यार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉमधील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसेदेखील दिली जातील.
‘लोकमत उडाण’ करिअर व्याख्यान
By admin | Updated: April 12, 2015 00:20 IST