लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By Admin | Updated: November 5, 2015 00:18 IST2015-11-05T00:18:51+5:302015-11-05T00:18:51+5:30
मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
अमरावती : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मोर्शी रोडवरील 'लोकमत भवना'च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल.
या लोकार्पण सोहळ्यात तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर, महापौर चरणजितकौर नंदा, अचलपूरचे उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाजोदीया हे अतिथी उपस्थित राहतील.