शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Lok Sabha Election 2019; प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 1:29 AM

गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देनवनीत राणा : परसापूर येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपरसापूर : गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत होत्या.प्रचारसभेला मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व केवलराम काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. मेळघाटच्या सर्वांगिण विकासासाठी नवनीत राणा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या माजी आमदारद्वयींनी केले. अंजनगाव सुर्जी परिसरात एमआयडीसी, कृषी विज्ञान केंद्र, तर परसापूर भागात संत्रा व केळी प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी सरपंच अरुणा वानखडे, माजी उपसरपंच वीरेंद्र वर्मा, जिल्हा संपर्क प्रमुख जितू दुधाने, वर्षा मनवरे, लता चुटे, शालिनी दुधे, ग्रा.पं. सदस्य आशिष वानखडे, छाया शिवणकर आदी उपस्थित होते.अंबागेटला जुने वैभव प्राप्त करुन देऊअमरावती : जुन्या अमरावतीमध्ये मोडणाऱ्या अंबागेटमधील प्राचिन मंदिरांचे सौंदर्यीकरण व विकासासाठी अधिकाधिक निधी देऊन या भागाला जुने वैभव प्राप्त करून देण्याची ग्वाही महाआघाडीच्या उमेदवार नवनित राणा यांनी दिली. तारखेडा, जुनी टाकसाळ, बुधवारा, इंद्रभुवन थिएटर, आदर्श गणेशोत्सव मंडळ येथे त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. नवनीत राणा यांच्या प्रचारसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार सभा घेण्यात येत आहेत.अंबागेटमधील परिसरात बोलताना नवनीत राणा हळव्या झाल्या. आ. रवि राणा हे सर्वांसाठी मुलासमान असून स्रुषा म्हणून आशीर्वाद दिल्यास या भागाचा चेहरामोहरा पालटविण्याची हमी त्यांनी दिली. आ. राणा यांनी काळा मारोती मंदिराला १० लाख रुपये निधी देण्याचे कबूल केले होते. पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या भागाचा विकास करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नगसेविका सुनीता भेले, नूतन भुजाडणे, माजी नगरसेविका अर्चना राजगुरे,किरण गुलवाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टींचा आज रोड शोप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांचा तिवसा येथे १० एप्रिलला रात्री ८ वाजता रोड शो करतील. नवनीत राणा व सुनील शेट्टी यांची रात्री ९ वाजता गुरुकुंज मोझरी येथे जाहीर सभा होईल. सुनील शेट्टी यांचा ११ एप्रिल रोजी चिखलदरा येथे मुख्य चौकात सकाळी ७ वाजता, सकाळी ८ वाजता सेमाडोह, सकाळी ९ वाजता हरिसाल व काटपूर येथे सकाळी १० वाजता रोड शो होईल. सकाळी ११ वाजता धारणी व चुर्णी येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019