लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा निवडणुकीची प्रचारतोफा मंगळवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावतील, अशी निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे. मात्र, ज्या गावात प्रचारासाठी पोहचले नाही, तेथे दोन दिवसांत मतदारांना भेटी देण्याचे नियोजन उमेदवारांनी चालविले आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघाची निडवणूक अटीतटीची होणार आहे. सूर्य आग ओकू लागल्याने दिवसा मतदारांपर्यंत पोहचणे फार जिकरीचे काम ठरत आहे. बहुतांश उमेदवारांची प्रचार वाहने अनेक गावांत पोहचली आहेत. परंतु, यंदा लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळाला. त्यामुळे उमेदवारांनी जास्त लोकसंख्येच्या गावांतील मतदारांना भेटीगाठी दिल्यात. परंतु, या धामधुमीत काही महत्त्वाची गावे सुटली. परिणामी १६ एप्रिलपूर्वी अशा गावांमध्ये उमेदवारांकडून प्रचारासाठी जाण्याचे नियोजन आखले जाणार असल्याचे संकेत आहेत. २४ उमेदवारांपैकी मोजक्याच उमेदवारांनी प्रचारार्थ जिल्हा पालथा घातला आहे. बऱ्याच उमेदवारांना दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावांची नावेसुद्धा माहीत नाही. थेट प्रचाराकरिता दोन दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. निवडणूक चिन्ह आणि प्रचार साहित्य मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी उमेदवारांची आता परीक्षा ठरणार आहे. यंदा अमरावती लोकसभा निवडणुकीत ९ पक्षाचे, तर १५ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करण्याची संधी असल्याने उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. येत्या दोन दिवसांत उन्हाची तमा न बाळगता प्रचार वाहने, कार्यकर्ते आणि उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे दिसून येत आहे.सायंकाळच्या प्रचाराला पसंतीउन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअस केव्हाच ओलांडला आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर प्रचार करणे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही अवघड ठरत आहे. उमेदवार दिवसा प्रचारास गेले असता मतदारांच्या भेटीगाठी घेणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे प्रचार दिवसाऐवजी सायंकाळी करण्यास कार्यकर्ते आणि उमेदवारांची पसंती आहे.
Lok Sabha Election 2019; प्रचारतोफा मंगळवारी थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:12 IST
अमरावती लोकसभा निवडणुकीची प्रचारतोफा मंगळवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावतील, अशी निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे. मात्र, ज्या गावात प्रचारासाठी पोहचले नाही, तेथे दोन दिवसांत मतदारांना भेटी देण्याचे नियोजन उमेदवारांनी चालविले आहे.
Lok Sabha Election 2019; प्रचारतोफा मंगळवारी थंडावणार
ठळक मुद्देउमेदवारांची लगबग : प्रचारासाठी न पोहचलेल्या गावांना भेटीचा प्रयत्न