शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना ‘अ‍ॅप’चे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:31 IST

आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसर्व उमेदवारी अर्ज ऑफलाइन ‘सुगम’, ‘सुविधा’, ‘समाधान’चा वापरच नाही

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अ‍ॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अ‍ॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणे सोयीचे व्हावे, यासाठीही अ‍ॅप आहे. मात्र, या अ‍ॅपवर आतापर्यंत एकही तक्रार पुराव्यानिशी आलेली नाही.प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी व यामध्ये तासन्तास जाणारा वेळ वाचावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे यावेळी प्रथमच अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना घरबसल्या उमेदवारी अर्ज करता यावा, यासाठी समाधान अ‍ॅप निर्माण करण्यात आले. हे ऑप आता नॅशनल गिव्हीनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने आहे. मात्र, या अ‍ॅपवर एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अत्यंत कमी दिवसांत लाखो मतदारांपर्यत उमेदवाराला जायचे असल्याने त्याचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आता निवडणुका, उमेदवार, आयोग अन् यंत्रणादेखील हायटेक होत असल्यान निवडणूक कार्यालयापर्यंत येण्याची पायपीटच नको व त्याद्वारे होणारा उमेदवारांचा लाखो रुपयांचा खर्च टाळता यावा, यासाठी आयोगाद्वारे ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या सहाही दिवसांत एकाही उमेदवाराने या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. त्यापेक्षा स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.निवडणूक म्हटले की, कमी दिवसात अधिकाधिक कामे करण्याकडे यंत्रणेसह उमेदवारांचा कल असतो हे हेरून आयोगाने यावेळी ‘सुविधा’ या अ‍ॅपद्वारे उमेदवारांना सुविधा दिल्यात.हे अ‍ॅप म्हणजे उमेदवारांसाठी जनू एक खिडकीच आहे. सर्व विभागाशी सबंधित सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी हे अ‍ॅ प महत्वपूर्ण आहे. या अ‍ॅपवर सभेसंदर्भात परवानगी मिळत असतांना एकाही उमेदवाराद्वारा या अ‍ॅपचा वापर करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे सुगम अ‍ॅपवर निवडणूक वाहनासंबंधी परवानगी मिळते. मात्र, सद्यस्थितीत एकाही वाहनाची परवानगी या अ‍ॅपद्वारे मागण्यात आलेली नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

‘सी व्हिजिल’चा वापरच नाहीनिवडणूक प्रक्रियेत जर मतदारांना उमेदवारांना प्रलोभने दिली जात असतील, तर आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. राजकारण्यांशी विरोध नको म्हणून अनेकदा नागरिक तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे नाव न जाहीर करता, तक्रार करता येण्यासाठी यावेळी आयोगाद्वारे सी व्हिजिल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपवर आतापर्यंत १२ तक्रारी करण्यात आल्यात. यापैकी तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक काळात महत्त्वपूर्ण मतदार अन् उमेदवारांनी अ‍ॅपचे गांभीर्य जाणले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुलभता यावी, यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात व याद्वारे मतदार व उमेदवार यांना सर्वतोपरी साहाय्य व्हावे, यासाठी अ‍ॅप उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा वापर मतदार व उमेदवारांना करण्याबाबत सूचना निवडणूक विभागाने केल्या आहेत.- अरुण रणवीर, जिल्हा सूचना,विज्ञान अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक