बडनेऱ्यात ‘लोगस्स’ जप साधना
By Admin | Updated: June 28, 2015 00:28 IST2015-06-28T00:28:53+5:302015-06-28T00:28:53+5:30
बडनेऱ्यातील जैन स्थानक या ठिकाणी ८ ते २८ जूनपर्यंत एकवीस दिवसीय ‘लोगस्स’ जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बडनेऱ्यात ‘लोगस्स’ जप साधना
जैन कार्यक्रम : वर्धमान श्वेतांबर जैन संघाचा उपक्रम
बडनेरा : बडनेऱ्यातील जैन स्थानक या ठिकाणी ८ ते २८ जूनपर्यंत एकवीस दिवसीय ‘लोगस्स’ जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाच्यावतीने लोगस्स जप साधनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्मियांना बोलविण्यात आले होते. दररोज २१ दिवसांपर्यंत सकाळी एक तास लोगस्स ध्यानसाधना घेण्यात आली. मौन साधनेच्या पूर्णाहुतीचा कार्यक्रम २८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पार पडणार आहे.
याच दिवशी प्रभातफेरीदेखील काढली जाणार आहे. नांदेड निवासी प्रफुल्लाजी यांनी बडनेऱ्यात २१ दिवसांपर्यंत मौन साधना केली. प्रफुल्लाजी यांनी सन १९७८ साली धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेतली आहे. तेव्हापासून त्या सतत प्रचाराच्या कामात आहेत. यापूर्वीदेखील प्रफुल्लाजींनी १९८८ मध्ये बडनेऱ्यात चातुर्मास केला होता.
प्रफुल्लाजी यांच्यासोबत साध्वी उदीत्ताजी, विशुद्धीजी, दक्षिणाजी यादेखील ध्यानसाधना कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बडनेऱ्यातील या कार्यक्रमाला जैन बांधवांसह इतरही समाजातील लोकांनी मोठ्यासंख्येत उपस्थिती दर्शविली आहे. येथे नियमितपणे कार्यक्रम होत आहे.