नाफेडच्या खरेदी केंद्राला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:44 IST2017-10-30T23:44:36+5:302017-10-30T23:44:57+5:30

स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यापासून मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Locked locked at Nafed's shopping center | नाफेडच्या खरेदी केंद्राला ठोकले कुलूप

नाफेडच्या खरेदी केंद्राला ठोकले कुलूप

ठळक मुद्देशेतकºयांचा माल खरेदीस नकार : काँग्रेस नेते संतप्त, अधिकाºयांनाही डांबले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यापासून मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, विविध कारणे पुढे करीत शेतमालाला खरेदीस नकार दिल्याने प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्त्वात सोमवारी खरेदी केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यातील नाफेडमार्फत सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीनची सरसकट खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावर्षी अतिवृष्टीने जिल्हाभरात मूग, उडीद, सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशीचेही नुकसान झाले. सोयाबीनचेही पीक हातून गेली. मात्र अशा स्थितीत काही शेतकºयांनी मूग-उडीद विक्रीसाठी आणले असता नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रांवर शेतमालास गुणवत्ता नाही, माल ओला आहे, कीड आदी कारणे पुढे करून अधिकाºयांनी ते खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतकºयांची व्यथा लक्षात घेत काँग्रेसने बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. याचवेळी संबंधित अधिकाºयांना याचा जाब विचारून त्यांना कार्यालयातच डांबून ठेवले. वातावरण तापल्याने अखेर अधिकारी बाहेर निघाले. मात्र खरेदी केंद्राचे टाळे कायम होते. हा प्रकार काँग्रेसचे नेते प्रकाश साबळे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. मूग, उडीद, सोयाबीनची शासकीय खरेदीची मागणी त्यांनी रेटून धरली. यावेळी बाजारसमितीचे सभापती प्रफुल्ल राऊत, समीर जवंजाळ व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Locked locked at Nafed's shopping center