शिक्षिकेसाठी शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 6, 2015 00:17 IST2015-10-06T00:17:08+5:302015-10-06T00:17:08+5:30
नजीकच्या वाडेगाव येथील जि.प. शाळेमध्ये शिक्षिकेची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चक्क शाळेला कुलूप ठोकले

शिक्षिकेसाठी शाळेला ठोकले कुलूप
विद्यार्थ्यांचा वर्ग भरला बाहेर
वरुड : नजीकच्या वाडेगाव येथील जि.प. शाळेमध्ये शिक्षिकेची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चक्क शाळेला कुलूप ठोकले. यापूर्वी काटी येथेसुध्दा शिक्षिकेच्या मागणीसाठी मुख्यव्दाराला कुलूप ठोकले होते. अखेर शिक्षकांनी शाळेच्या बाहेरच विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांची मध्यस्थी
वरुड : अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रकार निवळला.वाडेगांव येथे वरुड पंचायत समिती अंतर्र्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असून येथे १ ते ६ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. आसपासच्या गावांची मुले येथे शिक्षण घेतात. शाळेत ६ शिक्षक कार्यरत असून विद्यार्थी संख्या ६० आहे. पटसंख्येच्या तुलनेत ३ शिक्षक अतिरिक्त असल्याचे बोलले जाते. काटी येथे शिक्षकाची गरज असल्याने एका शिक्षिकेची तात्पुरत्या स्वरुपात पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली होती. सदर शिक्षिका काटीला रुजू झाल्यावर तिला वाडेगावलाच राहू द्या, अशी मागणी वाडेगावातील नागरिकांनी केली होती. यामुळे पुन्हा ही शिक्षिका वाडेगावला येणार, असे आदेश आलेत. ही कुणकुण काटीच्या नागरिकांना लागताच त्यांनीही शाळेला कुलूप ठोकले होत. परंतु वाडेगावच्या जि.प.शाळेमध्ये शिक्षकासाठी मागणी रेटून धरुन शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी अखेर मुख्यव्दारासमोरच मंडपाच्छादन करुन बालकांना शिक्षण दिले. अखेर गटशिक्षणाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत घातली आणि येथेच शिक्षिकेला रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.