‘ती’ कुलूपबंद महिला आता राज्य महिला गृहात

By Admin | Updated: December 16, 2014 22:42 IST2014-12-16T22:42:39+5:302014-12-16T22:42:39+5:30

मानवी विकृतीच्या कचाट्यात सापडलेल्या असहाय मनोरु्ण महिलेची परवड लोकमतने लोकदरबाराम मांडताच मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी

The locked lady is now in the state women's house | ‘ती’ कुलूपबंद महिला आता राज्य महिला गृहात

‘ती’ कुलूपबंद महिला आता राज्य महिला गृहात

इर्विनने मानले ‘लोकमत’चे आभार : जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल
अमरावती : मानवी विकृतीच्या कचाट्यात सापडलेल्या असहाय मनोरु्ण महिलेची परवड लोकमतने लोकदरबाराम मांडताच मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी चमूसह इर्विनमध्ये दाखल झाले. 'त्या' महिलेचा लगेच अकोला येथील राज्य महिला गृहात हलविण्यात आले.
तीन महिन्यांपासून कुणीही दखल घेत नसलेल्या या महिलेला लोकमतच्या एका वृत्ताने न्याय मिळाल्यामुळे इर्विनमधील परिचारिका कृतज्ञभाव व्यक्त करीत होत्या.
फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौकात ९ आॅक्टोबर ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिला अत्यवस्थेत आढळली होती. त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रंमाक ९ (आयसोलेशन वार्ड) मध्ये दाखल करण्यात आले. परिचारीका अलका सिरसाट यांनी संवेदशीलपणे आरोग्य सेवा पुरविली.
पुनर्वसन महिलागृहात होणार
परिचारीकेचे तीला बोलके करुन तिचे नाव जाणुन घेतले. त्या महिलेने स्वताचे नाव शिला व सांंरगरपुर असे गावाचे नाव सांगितले. मात्र तीची ओळख पटली नव्हती. त्या महिलेलची ओळख पटविण्याचे आवाहन निर्माण झाले होते. दोन महिन्यापासून शिला हीच्यावर उपचार सुरु होता या सदर्भांतचे वृत्त मंगळवारी लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कैलास घोडके व सुरेखा मामर्डे यांचे पथकांने इर्विनच्या वार्ड क्रंमाक ९ मध्ये भेट दिली. शिला या महिलेची पाहणी करुन तत्काळ अकोला येथील राज्य महिला गृहात पाठविले. जिल्हा बाल विकास अधिकारी त्या महिलेच्या पत्ता शोधून काढणार असून तो पर्यंत शिलाला राज्य महिला गृहात शिला राहणार आहेत. तीच्या पुर्ववर्सनाची जबाबदारीराज्य महिला गृहाकडे गेल्याने परिचारीकांच्या आरोग्य सेवा सार्थक ठरली आहे.

Web Title: The locked lady is now in the state women's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.