लॉकडाऊनमध्ये भरला पुसल्याचा आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:29+5:302021-03-04T04:22:29+5:30
पुसला : गावात कोरोनाचा उद्रेक होत असताना पुसल्यात आठवडी बाजार भरला. बाजारात मास्क व फिजिकल डिस्टन्सचे पालन ...

लॉकडाऊनमध्ये भरला पुसल्याचा आठवडी बाजार
पुसला : गावात कोरोनाचा उद्रेक होत असताना पुसल्यात आठवडी बाजार भरला. बाजारात मास्क व फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने शासनाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
पुसला गावाला लहान-मोठी अदिवासी खेडी लागून असल्याने या आठवडी बाजारात ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, बाजार भरविण्याचे नियोजन कोलमडले आहे. बाजारात विक्रेते व ग्राहक मास्कचा वापर करीत नसून सर्रास वावर सुरू आहे. त्यामुळे आठवडी बाजार कोरोना संक्रमणाकरिता धोक्याची घंटा आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.
-----------