स्थायीत प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

By Admin | Updated: February 12, 2015 00:09 IST2015-02-12T00:09:39+5:302015-02-12T00:09:39+5:30

महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थायी समितीत प्रवेशासाठी अनेक सदस्य इच्छूक आहेत. मात्र नैसर्गिक प्रक्रियेनुसार आठ सदस्य बाहेर पडणार

'Lobbying' for permanent access | स्थायीत प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

स्थायीत प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

अमरावती : महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थायी समितीत प्रवेशासाठी अनेक सदस्य इच्छूक आहेत. मात्र नैसर्गिक प्रक्रियेनुसार आठ सदस्य बाहेर पडणार असून त्यांच्या जागी पुन्हा नव्याने आठ सदस्यांची वर्णी लागणार आहे. मात्र प्रवेशासाठी लांबलचक यादी असल्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. इच्छुक सदस्यांनी स्थायीत प्रवेशासाठी ‘लॉबींग’ सुरु केली आहे.
येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत पक्षाच्या सदस्य संख्येनुसार ८ सदस्य स्थायी समितीत पाठविले जाईल. त्यानुसार काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी दोन, शिवसेना, भाजप, रिपाइं- जनविकासचे प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश राहणार आहे. गटनेते सुचवतील त्या पत्राच्या आधारे महापौर चरणजितकौर नंदा या सदस्यांच्या नावांची सभागृहात घोषणा करेल, अशी नियमावली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून या वादावर १६ फेबु्रवारी रोजी अंतीम निकाल लागण्याची शक्यता आहे. सुनील काळे आणि अविनाश मार्डीकर यांच्यात गटनेतेपदावरुन वाद सुरु आहे.
'हे' सदस्य पडतील बाहेर
स्थायी समितीमधून नैसर्गिक प्रक्रियेनुसार आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे. यात विद्यमान सभापती मिलिंद बांबल, जयश्री मोरे, प्रवीण हरमकर, अंबादास जावरे, कांचनव डेंडुले, नूरखाँ मौजदारखाँ, धीरज हिवसे, सुगनचंद गुप्ता यांचा समावेश राहणार आहे. याच आठ सदस्यांच्या जागी नव्याने सदस्यांची वर्णी लागणार आहे.

Web Title: 'Lobbying' for permanent access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.