१.१८ लाख शेतकऱ्यांना ७३७ कोटींची कर्जमाफी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:50 IST2018-06-16T21:49:48+5:302018-06-16T21:50:10+5:30
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख २१ हजार २५५ शेतकºयांना ७५३.१४ कोटींंच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मागील आठवड्यात जवळपास २५ हजार खातेदारांची नववी ग्रीन लिस्ट बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान १.४५ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

१.१८ लाख शेतकऱ्यांना ७३७ कोटींची कर्जमाफी वर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख २१ हजार २५५ शेतकºयांना ७५३.१४ कोटींंच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मागील आठवड्यात जवळपास २५ हजार खातेदारांची नववी ग्रीन लिस्ट बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान १.४५ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील बँकांना साधारणपणे ७६ हजार मिसमॅच अर्जांची येलो लिस्ट प्राप्त झाली आहे. या यादींच्या पडताळणीनंतर शासनाच्या आयटी विभागाला याद्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यामधील पात्र शेतकºयांची नावे आता ग्रीन लिस्टमध्ये पाठविण्यात येत आहेत. आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्हा बँकेच्या कर्जदार एक लाख चार हजार शेतकºयांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धस्तरावर सुरू आहे.
एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या शासनाच्या आयटी विभागाकडे अपलोड करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या - त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्यात आल्या आहेत.
नवव्या ग्रीन लिस्टची पडताळणी सुरू
जिल्ह्यात यापूर्वी सात ग्रीन लिस्ट आल्यात. त्यानंतर आठवी लिस्ट रद्द झाल्याने नववी लिस्ट या आठवड्यात आली. यामध्ये २५ हजार खातेदारांचा समावेश आहे. जिल्हा बँकेचे ४,९२२ खातेदार आहेत यापैकी ४,३२७ खातेदार पडताळणीअंती पात्र झाले आहेत. साधारणपणे कमर्शियल बँकांच्या २० हजार खातेदारांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये थकबाकीदार खातेदार, प्रोत्साहनपर खातेदारांचा समावेश आहे.
कर्जमाफीच्या याद्या बँकांमध्ये लागणार
अनेक खातेदारांना त्यांच्या कर्जमाफीविषयीची माहितीच नाही. बँका माहिती देत नाहीत, पोर्टलवर नावे नाहीत. त्यामुळे या आठवड्यात ग्रामसेवक तलाठी, तहसीलदार, सहायक निबंधक व संबंधित बँकांमध्ये आजवर कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांंना कर्जमाफीचा लाभ मिळाला की नाही, याची त्वरित माहिती मिळण्यास मदत होणार आहे.