पक्षिमित्रांनी दिले जखमी मोराला जीवदान

By Admin | Updated: February 7, 2016 01:03 IST2016-02-07T01:03:32+5:302016-02-07T01:03:32+5:30

सर्वांचा आवडता असणारा व राष्ट्रीय पक्षी असलेला पक्षांचा राजा मोर हा सामाजिक कार्यकर्ते पक्षिप्रेमी उज्ज्वल थोरात यांना वडाळी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ...

Lived the paralyzed injured peacocks | पक्षिमित्रांनी दिले जखमी मोराला जीवदान

पक्षिमित्रांनी दिले जखमी मोराला जीवदान

उपचार : छत्री तलावाजवळ आढळलेल्या मोराला उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावर नेले
संदीप मानकर अमरावती
सर्वांचा आवडता असणारा व राष्ट्रीय पक्षी असलेला पक्षांचा राजा मोर हा सामाजिक कार्यकर्ते पक्षिप्रेमी उज्ज्वल थोरात यांना वडाळी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या छत्री तलावाजवळील जंगलात शनिवारी सकाळी ८ वाजता दरम्यान जखमी अवस्थेत आढळला. या मोरावर खासगी पशू डॉक्टरांकडे उपचार करून काही पक्षिप्रेमींनी हा मोर थेट उपवसंरक्षक निनू सोमराज यांच्या शासकीय निवासस्थानी नेला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
दीड तास भर निनू सोमराज बंगल्याच्या बाहेरच न आल्यामुळे येथे उपस्थित पक्षिप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटले. मधुबन वन्यजीव संरक्षण संघटनेचे संस्थापक व पक्षिमित्र उज्ज्वल थोरात हे नेहमीप्रमाणे भानखेड छत्रीतलाव मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांना या मार्गावर जंगलात काही मोर दिसले. २ ते ३ मोर जंगलाच्या दिशेने पळून गेले. परंतु एक मोर जखमी अवस्थेत तेथेच थांबल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले, तर तो मोर जखमी अवस्थेत आढळून आला. पक्षिप्रेमींनी आपले मित्र व नीलेश कांचनपुरे, योगेश खेडकर, लोकेश वानखडे, अभिजित दाणी, गुणवंत पाटील व कुवरचंद श्रीवास यांना माहिती दिली. सर्वांनी जखमी मोराला खासगी पशुवैद्यक अविराज कदम यांच्याकडे नेले. तेथे डॉक्टरांनी मोरावर उपचार केल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र त्यांनी लक्ष न दिल्याने थेट उपवनसंरक्षकांचे निवासस्थान गाठले. पण तेथेही त्यांना निराशा आल्याने त्यांनी वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. पडगव्हाणकर यांच्या ताब्यात दिले. दरम्यान वनरक्षक बी.डब्ल्यू खैरकर यांनी जखमी मोराला जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Lived the paralyzed injured peacocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.