जखमी अजगराला शस्त्रक्रियेने जीवदान
By Admin | Updated: January 25, 2017 00:09 IST2017-01-25T00:09:21+5:302017-01-25T00:09:21+5:30
विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवास्थानाजवळ पकडण्यात आलेल्या अजगराला इजा झाली होती.

जखमी अजगराला शस्त्रक्रियेने जीवदान
जंगलात सोडले : पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे उपचार
अमरावती : विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवास्थानाजवळ पकडण्यात आलेल्या अजगराला इजा झाली होती. तेव्हा सर्पमित्रांनी त्याला जीवदान मिळावे याकुरता त्याच्या उपचारासाठी येथील जिल्हापशू सर्वचिकित्सालयाच्या आणण्यात आले होते. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या चमुने त्या अजगरावर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर त्याला काही तास दवाखान्यात ठेवल्यानंतर त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
विभागीय आयुक्त जे.पी गुप्ता यांच्या शासकीय बँगल्यानजीक १७ जानेवारी रोजी एक अजगर निघाला. याच परिसरात दुसऱ्या दिवशी आणखी एक अजगर निघाला होता. त्यातील एका अजगराला इजा झाली होती.
यंदाची पहिली शस्त्रक्रिया
अमरावती : त्याला टिचेस देण्यात आले. दुसऱ्या अजगरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अजगर पकडताना दोघांनाही इजा झाली. अंदाजे १५ फूट लांब त्या अजगराच्या मणक्याला(स्पाईनल स्कॉडला) डॉक्टरांना चमुला फ्रॅक्चर आढळले. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याला ओषधी देऊन त्याला बॅनडेज बांधण्यात आले. या वर्षातील अजगरावर झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.शस्त्रक्रिया ही सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुसर्व चिकित्सालय आर.एस.पेठे, पशुधन विकास अधिकारी शंकर मुत्तेलवार, पंकज रवाळे, अनिल किटुकले आदी डॉक्टरांनी केली. उपचारानंतर अजगराला वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांनी सदर त्याला जंगलात सोडल्याची माहिती आहे.
सदर अजगराच्या स्पाईनल स्कॉडमध्ये फ्रॅक्चर आढळले होेते. डॉक्टरांच्या चमुने त्यावर यशस्वी शस्त्रक्रि या करून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशीही जखमी अजगरावर उपचार करण्यात आला.
- राजेंद्र पेठे, सहयक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा,
सर्वपशु चिकित्सालय