आरटीई प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी होणार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:10+5:302021-04-10T04:13:10+5:30
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या ...

आरटीई प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी होणार जाहीर
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातील संदेश पालकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर येतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आतील तरतुदीनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार प्रवेशपात्र शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. आरटीईनुसार कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित उत्साहित शाळेत २५ टक्के इतक्या जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठी एकाच टप्प्यात लॉटरी ७ एप्रिल रोजी काढण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉटरी प्रक्रियाही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरावर काढण्यात आली आहे. प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला तसेच विद्यार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बॉक्स
१५ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा
प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी १५ एप्रिल रोजी संकेतस्थळ उपलब्ध होणार आहे. प्रवेशाबाबत सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रवेशाबाबत शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.